फँटा घालुन मॅगी केली, नेटकरी झाले संतप्त म्हणाले, आता यानंतर जगबुडी व्हायची बाकी राहिलीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:00 IST2021-11-22T16:00:07+5:302021-11-22T16:00:14+5:30
२ मिनिटांत बनणारी ‘मॅगी’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच्या चवीने सगळ्यांना वेड लावले आहे आणि जेव्हा कोणी या पदार्थाचा प्रयोग करतो तेव्हा पाहणाऱ्याला नक्कीच राग येतो आणि प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो, की हे लोक कोण आहेत आणि कुठून आले आहेत? लॉ

फँटा घालुन मॅगी केली, नेटकरी झाले संतप्त म्हणाले, आता यानंतर जगबुडी व्हायची बाकी राहिलीय
जगात अशी अनेक माणसे आहेत ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं खायला आवडते. प्रत्येकाची फूड टेस्ट आणि पॅलेट वेगवेगळे असते आणि फक्त तोच ठरवू शकतो की त्याने काय खावे. पण, अनेकवेळा अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात ज्या पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ओह माय गॉड’. हा व्हायरल व्हिडीओ पाहून मॅगीप्रेमींच्या संतापाचा उद्रेक होत आहे.
२ मिनिटांत बनणारी ‘मॅगी’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच्या चवीने सगळ्यांना वेड लावले आहे आणि जेव्हा कोणी या पदार्थाचा प्रयोग करतो तेव्हा पाहणाऱ्याला नक्कीच राग येतो आणि प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतो, की हे लोक कोण आहेत आणि कुठून आले आहेत? लॉकडाऊनच्या काळापासून मॅगीवर अनेक प्रयोग झाले आहेत. काहीजण त्यात दूध घालून गोड करतात, तर काहीजण मॅगीमध्ये पाणीपुरी टाकून खातात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने ‘फँटा कोल्ड ड्रिंक’मध्ये मॅगी बनवली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका फेरीवाल्याने कढईत तूप टाकले आणि नंतर कांदे, हिरव्या मिरच्या, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून फोडणी दिली. मग त्याने पॅनमध्ये ‘फँटा’ कोल्ड्रिंकची पूर्ण बाटली ओतली. मॅगी, मसाला, हळद, धणे पावडर आणि मीठ उकळत्या फँटामध्ये मिसळले. मॅगी फँटा सुकायला लागल्यावर त्यावर चाट मसाला आणि लिंबू घालून सर्व्ह केले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘हे बघून मला सूर्यवंशमच्या उलट्या आठवल्या.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भाऊ, अशा प्रकारे मॅगी खाणे अशक्य आहे.’ दुसऱ्या यूजरने व्हिडीओवर कमेंट केली. त्याने लिहिले, ‘जगाचा अंत जवळ आला आहे असे दिसते’. हा व्हिडीओ Foodie_incarnate नावाच्या यूट्यूब अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला बातमी लिहेपर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.