बाई...! दोन पती असूनही महिलेने बनवला एक बॉयफ्रेन्ड, अचानक घरी आला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:38 IST2024-12-09T12:37:55+5:302024-12-09T12:38:33+5:30
आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबाबत सांगणार आहोत जिने दोन लग्ने तर केलीच, सोबतच एक बॉयफ्रेन्डही बनवला. आता ही महिला दोन पती आणि एका बॉयफ्रेन्डसोबत एकाच घरात राहते.

बाई...! दोन पती असूनही महिलेने बनवला एक बॉयफ्रेन्ड, अचानक घरी आला आणि मग...
Viral Video: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एखादा तरी पार्टनर असतो. सामान्यपणे एकदा लग्न झालं की, पुरूष दुसऱ्या महिलांबाबत विचारही करत नाहीत. तर काही लोक असे असतात की, एकदा लग्न झालं असूनही दुसरं लग्न करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबाबत सांगणार आहोत जिने दोन लग्ने तर केलीच, सोबतच एक बॉयफ्रेन्डही बनवला. आता ही महिला दोन पती आणि एका बॉयफ्रेन्डसोबत एकाच घरात राहते.
केन्या स्टिवेंसचा याआधीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तिने सांगितलं होतं की, तिने दोन पुरूषांसोबत लग्न केलं. तिघेही एकाच घरात सोबत राहतात. केन्या म्हणाली होती की, दोन्ही पती तिच्या खूप प्रेम करतात. केन्याच्या पहिल्या पतीचं नाव कार्ल आहे. त्याच्यासोबत ती २६ वर्षापासून आहे आणि दुसऱ्या पतीचं नाव टायगर आहे त्याच्यासोबत १० वर्षांपासून आहे.
केन्याने आपला आनंद व्यक्त करत सांगितलं होतं की, आम्ही सगळे एकत्र खूप आनंदाने राहतो. तेही एकाच घरात. केन्याने सांगितलं की, तिचे दोन्ही पती बिझनेसमन आहेत. व्हिडिओत बघू शकता की, केन्याचे दोन्ही पती सोफ्यावर बसले आहेत. इतक्यात दरवाज्याची बेल वाजते. केन्या दार उघडते आणि दारावर आलेल्या बॉयफ्रेन्डला मीठी मारते. त्यानंतर दोघेही घरात जातात. केन्याचे दोन्ही पतीही त्याचं स्वागत करतात. टायगरने सांगितलं की, जेव्हा ते पहिल्यांदा डेविडला भेटले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की, त्यांना त्याच्याकडून काय अपेक्षा आहे. अचानक तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याने त्यांना त्यांच्या बेडरूममधून बाहेर जावं लागलं. तरीही तिघे एकाच घरात राहतात.
हा व्हिडीओ sceneinblack नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. तसेच लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.