काय तो पाऊस, काय तो नजारा! तेवढ्यात पतीवर आकाशातून वीज कोसळली; पत्नी Video रेकॉर्ड करत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:13 IST2022-07-07T19:13:06+5:302022-07-07T19:13:40+5:30

एक पिकअप ट्रक ड्रायव्हर हायवेवरून जात होता. तेव्हा त्याची पत्नी त्याच्या मागच्याच गाडीतून येत होती.

Lightning struck the husbands Car from the sky; The wife was recording the video of Rain | काय तो पाऊस, काय तो नजारा! तेवढ्यात पतीवर आकाशातून वीज कोसळली; पत्नी Video रेकॉर्ड करत होती

काय तो पाऊस, काय तो नजारा! तेवढ्यात पतीवर आकाशातून वीज कोसळली; पत्नी Video रेकॉर्ड करत होती

आपण अनेकदा वीज कोसळल्याचा आवाज ऐकतो, वीज कडाडताना पाहतो. परंतू, वीज कोसळताना पाहिलेले कमी आहेत. एका महिलेने पतीवरच वीज कोसळतानाचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 

एक पिकअप ट्रक ड्रायव्हर हायवेवरून जात होता. तेव्हा त्याची पत्नी त्याच्या मागच्याच गाडीतून येत होती. यावेळी अचानक पतीच्या ट्रकवर वीज कोसळली. आगीचे लोळ उठले. पत्नी तेव्हा हा व्हिडीओ रेकॉर्ड करत होती, योगायोगाने वीज कोसळतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. याहून चांगली बाब म्हणजे पती बालंबाल बचावला आहे. 

या भयावह घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामधील आहे, असे सांगितले जात आहे. १ जुलैला एडवर्ड वालेन हे आपला मिनी ट्रक घेऊन घरी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेदेखील होती. तर त्यांच्या मागे त्यांची पत्नी मिशेल ही दुसरी कार चालवत येत होती. यावेळी रस्त्यावर वेगाने वारे वाहू लागले, पाऊसही पडू लागला. यामुळे हे रेकॉर्ड करण्यासाठी मिशेलने मोबाईल कॅमेराने चित्रिकरण सुरु केले. यावेळीच अचानक वीज कोसळली. 

पहा हा व्हिडीओ...

Web Title: Lightning struck the husbands Car from the sky; The wife was recording the video of Rain