शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हरणाने मृत्यूनंतर बिबट्याकडून घेतला बदला, कसा? पाहा हा थरारक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:31 IST

सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही म्हणाल की हरणाने आपला बदला घेतला.

बिबट्या (Leopard) हा भीतीदायक आणि हिंस्र प्राण्यांमधील एक आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो आपली शिकार करतो. अतिशय सहजपणे आणि वेगात तो शिकार करतो. सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही म्हणाल की हरणाने आपला बदला घेतला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बिबट्याने आपल्या जबड्यात एक मृत हरण पकडलेलं आहे. यानंतर तो हरणाला तोंडात पकडूनच झाडावर चढतो. यानंतर मृत हरणाला झाडाच्या फांदीवर ठेवून तो खाली उतरतो. यानंतर जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे. तुम्ही पाहू शकता, की झाडावर बिबट्याचा बछडाही बसलेला आहे. चुकून त्याच्याकडून हरणाचा मृतदेह खाली कोसळतो आणि थेट बिबट्याच्या अंगावर पडतो. अचानक वरून काहीतरी पडल्याचं जाणवताच बिबट्या घाबरतो आणि मोठी उडी मारून बाजूला होतो.

एका मिनिटाचा हा व्हिडिओ यूट्यूबवर Latest Sightings नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक दिवस आधी शेअर केलेला हा व्हिडिओ ३५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. काही यूजरनी हा हरणाने घेतलेला बदला असल्याचं म्हटलं.

एक हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, अद्भुत फुटेज आहे. मात्र, ज्याप्रकारे हरण बिबट्यावर पडलं, ते अतिशय विनोदी वाटलं. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, व्हिडिओ पाहून असं वाटलं, की हरण मृत्यूनंतरही बिबट्यासोबत लढत आहे. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाleopardबिबट्याYouTubeयु ट्यूब