Leave Gulab Jamun and pizza now social media users is upset over Kurkure Milkshake | दुध मॅगी नंतर एकाने केलं 'कुरकुरे मिल्कशेक', लोक म्हणाले, अरे पगला गये हो का?
दुध मॅगी नंतर एकाने केलं 'कुरकुरे मिल्कशेक', लोक म्हणाले, अरे पगला गये हो का?

पदार्थ आणखी टेस्टी करण्यासाठी त्यात वेगवेगळे एक्सपरिमेंट करणं चांगली गोष्ट आहे. पण काही लोक टेस्टच्या नावाखाली काहीतरी भलतंय करण्यासाठी धडपडत असतात. म्हणजे या लोकांना केलेल्या एक्सपरीमेंटवर काय बोलावं आणि काय नको असं होतं. यांचे एक्सपरिमेंट बघूनच मनात धडकी भरते की, हे कसं लागेल. 

काही दिवसांपूर्वी 'दूधात मॅगी' तयार केली गेली होती. त्यानंतर 'चॉकलेट डोसा'. या एक्सपरिमेंट्सनी सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ झाला होता. आता तसंच एक 'कुरकुरे मिल्कशेक'चं एक्सपरिमेंट लोकांचा छळ करत आहे. 

एका व्यक्तीने 'कुरकुरे मिल्कशेक'चा फोटो शेअर केला आणि बस्स लोकांना रहावलं नाही. लोक यावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देऊ लागले.


Web Title: Leave Gulab Jamun and pizza now social media users is upset over Kurkure Milkshake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.