VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:58 IST2023-02-08T13:56:28+5:302023-02-08T13:58:07+5:30

Out Of Control Ladies Dancing :हा व्हिडीओ दीपक नावाच्या एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ढोला-ताशे वाजत आहेत आणि आजूबाजूला खूप लोक उभे आहेत. यावेळी काही लोक तालावर डान्स करणं सुरू करतात.

Ladies out of control dancing with dhol nagada lying on floor infront of public | VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स

VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स

Out Of Control Ladies Dancing : अनेकदा लोक डान्स करता करता इतके बेभान होतात की, त्यांना कल्पनाही नसते की ते कोणत्या आणि कशा स्टेप्स करत आहेत. सोशल मीडियावर असाच एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात काही महिला ढोल-ताशांवर डान्स करता करता जमिनीवर लोळतात. यादरम्यान त्यांनी असं काही केलं की, त्यांना रोखावं लागलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ दीपक नावाच्या एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ढोला-ताशे वाजत आहेत आणि आजूबाजूला खूप लोक उभे आहेत. यावेळी काही लोक तालावर डान्स करणं सुरू करतात. तिथे असलेल्या काही महिलाही डान्स सुरू करतात. जशा महिला डान्स करू लागल्या लोक बाजूला झाले. त्यानंतर त्या खाली जमिनीवर झोपून डान्स करू लागल्या.

यावेळी तिथे असलेले लोक हे बघून हैराण झाले की, महिला खाली जमिनीवर झोपून डान्स करू लागल्या. आधी तर दोन महिलांनी डान्स सुरू केला होता. नंतर त्यांना बघून इतरही महिलांनी उडी घेतली आणि डान्स करू लागल्या. यावेळी कशाचाही विचार न करता त्या बिनधास्त जमिनीवर झोपून डान्स करू लागल्या होत्या.

हा डान्स बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली नाही. काहींना महिलांचा हा डान्स आवडला नाही तर त्यांनी त्यांचा डान्स रोखण्याचाही प्रयत्न केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, या महिलांना तिथून बाजूला करण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण  यूजर्स या महिलांवर भडकले आहेत. सोबतच सल्लाही दिला की, असा डान्स करण्यापेक्षा न केलेला बरा.

Web Title: Ladies out of control dancing with dhol nagada lying on floor infront of public