'आजीबाई जोमात नेटकरी कोमात...' समुद्रकिनारी कॅमेरा हातात घेतला अन् केले फोटोशूट ; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:33 IST2023-12-27T12:19:30+5:302023-12-27T12:33:08+5:30

सोशल मीडियावर आजीबाईंच्या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे.

Konkan Ganpatipule beach grandmother learning how toclick photo on camera video goes viral on social media  | 'आजीबाई जोमात नेटकरी कोमात...' समुद्रकिनारी कॅमेरा हातात घेतला अन् केले फोटोशूट ; Video व्हायरल

'आजीबाई जोमात नेटकरी कोमात...' समुद्रकिनारी कॅमेरा हातात घेतला अन् केले फोटोशूट ; Video व्हायरल

Viral Video : आवड असली तर सवड मिळते असं अनेकदा म्हटल जातं. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपआपल्या कामामध्ये व्यग्र झालाय. आपला छंद जोपसणं लांबच राहिलं स्वत: च्या आरोग्यासाठीही वेळ देणं ही लोकांना अवघड झालंय. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका आजीबाईंच्या व्हिडीओने नेटकऱ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केलं आहे. 

या आधी सोशल मीडियावर आजी, आजोबांचे व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. त्यात या आजीबाईंचा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये कोकणातील प्रसिद्ध अशा गणपतीपुळे समुद्रकिनारी या आजीबाई फिरायला गेल्या आहेत. नऊवारी साडी नेसून आजीबाई समुद्रकिनारी आपल्या कुटुंबियांसोबत सफर करताना दिसतायेत. 

एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी या आजीबाईंनी चक्क कॅमेरा हातात घेतलाय. वेगवेगळे ॲंगल घेत समुद्रकिनारी त्या फोटो काढताना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आजीबाईंची काहीतरी नवीन शिकण्याची धडपड यातून जिसत आहे.स्वप्नांना वयाचं बंधन नसतं हे या आजीबाईंनी दाखवून दिलंय. क्षुल्लक कारणावरून आपल्या ध्येयापासून परावृत्त होणाऱ्या तरुणांना या व्हिडीओतून नक्कीच बोध मिळेल. 
 
दरम्यान, इंस्टाग्रामवर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय फोटो काढणाऱ्या आजींचा स्वॅग नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Konkan Ganpatipule beach grandmother learning how toclick photo on camera video goes viral on social media