रस्त्यावर दिसणारं हे साइन बोर्ड तुम्हीही पाहिलं असेल, पण याचा अर्थ अनेकांना माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:03 IST2025-03-25T13:01:21+5:302025-03-25T13:03:41+5:30

Viral Video : एक बोर्ड असं आहे ज्याकडे फारसं कुणी लक्षच देत नाही. त्याचबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Know the meaning of this sign board video goes viral | रस्त्यावर दिसणारं हे साइन बोर्ड तुम्हीही पाहिलं असेल, पण याचा अर्थ अनेकांना माहीत नसेल!

रस्त्यावर दिसणारं हे साइन बोर्ड तुम्हीही पाहिलं असेल, पण याचा अर्थ अनेकांना माहीत नसेल!

Viral Video : रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालवण्याच्या, ठिकाणाच्या, रस्त्याच्या वेगवेगळ्या सूचनांचे बोर्ड आपण नेहमीच पाहत असतो. यातील काही सूचनांचे बोर्ड आपल्याला तोंडपाठ असतात. पण असेही अनेक बोर्ड असतात ज्याबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं किंवा ते त्याकडे आपण लक्षच देत नाही. संबंधित विभागाकडून दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे बोर्ड लावलेले असतात. स्पीड ब्रेकर, पुढे गाव आहे किंवा पुढे वळण आहे अशा सूचना यावर असतात. पण एक बोर्ड असं आहे ज्याकडे फारसं कुणी लक्षच देत नाही. त्याचबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इन्स्टाग्रामवर एक ट्रॅफिक सब इन्स्पेक्टर एका अशा साइनबाबत सांगत आहेत जे तुम्ही कधीतरी पाहिलं असेल, पण त्याचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल. रस्त्यावर उभे राहून बोर्डाकडे इशारा करत ते बोर्डावरील साइन दाखवत आहे. बोर्डवर एक चौकोणी डबा आणि खाली झिकझॅक खूण आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे साइन दाखवतं की, पुढे ओव्हरहेड केबल आहे. जेथून तुम्हाला क्रॉस करायचं आहे. अनेकदा काही कारणास्तव केबल तुटून खाली लटकतात, अशात हे साइन तुम्ही पाहिलं नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते. 

त्यांनी पुढे सांगितलं की, हे साइन बोर्ड पाहिल्यावर तुम्हाला समोर बघायचं आहे की, केबल तुटून खाली तर लटकली नाहीये ना...त्यानंतरच पुढे जायचं आहे. जेणेकरून घाईच्या नादात कोणतीही दुर्घटना होऊ नये. हा व्हिडीओ दोन दिवसांआधी शेअर करण्यात आला आणि आतापर्यंत या व्हिडिओला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. लोकांना या साइन बोर्डची माहिती दिल्याबाबत अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.

Web Title: Know the meaning of this sign board video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.