शेवटी आई ती आईच! कुत्रीनं मांजरीच्या पिल्लाला पाजलं दूध; व्हिडीओ पाहून पब्लिक म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:09 IST2021-01-25T17:08:40+5:302021-01-25T17:09:45+5:30

Trending Viral News in Marathi : या व्हिडीओमध्ये  एक मांजर एका मादी कुत्र्याचे दूध पित आहे आणि कुत्रीलाही याबाबत कोणताही त्रास नसून  ती शांतपणे पडून आहे. जणूकाही ती स्वतःच्या पिल्लांना दूध पाजत आहे.

Kitten feed milk from dog in nigeria video viral | शेवटी आई ती आईच! कुत्रीनं मांजरीच्या पिल्लाला पाजलं दूध; व्हिडीओ पाहून पब्लिक म्हणाली....

शेवटी आई ती आईच! कुत्रीनं मांजरीच्या पिल्लाला पाजलं दूध; व्हिडीओ पाहून पब्लिक म्हणाली....

कुत्रा आणि मांजरीतील भांडण संपूर्ण जगाला  परिचयाचे आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इमारतीत, परिसरात किंवा कॉलनीत कुत्रा आणि मांजरीची भांडणं अनेकदा पाहिली असतील. पण याही पलिकडे कुत्रा मांजरीचं नातं असतं, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये  एक मांजर एका मादी कुत्र्याचे दूध पित आहे आणि कुत्रीलाही याबाबत कोणताही त्रास नसून  ती शांतपणे पडून आहे. जणूकाही ती स्वतःच्या पिल्लांना दूध पाजत आहे.

हा व्हिडीओ नायजेरियातील एका गावातून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मादी कुत्रा  जमिनीवर झोपला असून त्याच्या गळ्यात एक काळ्या रंगाचा पट्टा  आहे.  मांजरीचे पिल्लू या  कुत्रीचे दूध पीत आहे. कुत्रीला मांजरीच्या दूध पिण्यानं काहीही त्रास नाही. असं या फोटोत दिसून येत आहे. वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

हा व्हायरल व्हिडीओ वृत्त संस्था रॉयटर्सनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.  ३२ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये कुत्रा आणि मांजर एकमेकांसह  दिसून येत आहे. असं दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांनीही हे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर वेगानं व्हायरल झाला आहे. आतापर्यंत   २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या रिएक्शन्स देत आहेत. अनेकांनी या दृश्याचे कौतुक केले आहे. वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

Web Title: Kitten feed milk from dog in nigeria video viral