कुकरचं झाकण, शिटी खराब होऊ न देणारी खास आयडिया, बघून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:02 IST2024-09-27T14:14:24+5:302024-09-27T15:02:55+5:30
Kitchen Hacks : कुकर लावताना प्रेशरमुळे आतील पाणी किंवा डाळ छाकणावर पसरते. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. मात्र, सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कुकरचं झाकण, शिटी खराब होऊ न देणारी खास आयडिया, बघून व्हाल अवाक्!
Kitchen Hacks : आजकाल सर्रासपणे किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. कारण याने लवकर जेवण तयार होतं. मात्र, अनेकदा शिटीसोबतच कुकरचं झाकणही खराब होतं. कारण कुकर लावताना प्रेशरमुळे आतील पाणी किंवा डाळ छाकणावर पसरते. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. मात्र, सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, गॅसवर कुकर ठेवलेला आहे. एक महिला शिटी वर करून त्यावर मोहरीचं तेल टाकत आहे. तसेच झाकणाचा रिंग काढून तिथेही तेल लावत आहे. तेल लावल्यावर शिटी आणि रिंग पुन्हा लावून कुकर गॅसवर ठेवत आहे. महत्वाची बाब म्हणजे तेल लावल्यानंतर शिटी जेव्हा वाजते तेव्हा कुकरचं झाकणं अजिबात खराब होत नाही.
कुकर खराब होण्यापासून रोखण्यासाठी ही एक चांगली ट्रिक आहे. याच कारणाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टावर हा व्हिडीओ @ayurvedahealthstudio हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
अनेक यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'याहूनही चांगला उपाय म्हणजे कुकरमध्ये पाणी योग्य प्रमाणात टाका. ते बाहेर येणार नाही'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'तेल टाकल्याने कुकरमध्ये स्फोट होऊ शकतो'. तिसऱ्याने लिहिलं की, 'चुकून जर तेल नोजलमध्ये अडकलं तर राम राम सत्य होईल'. अनेकांना ही आयडिया आवडली सुद्धा आहे.