VIDEO : मेन्यूकार्ड बघून व्यक्तीने नवीन डिश केली ऑर्डर, वेटरने समोर ताटात आणून ठेवले 'महिलेचे ओठ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:01 IST2026-04-07T17:00:51+5:302026-04-07T17:01:32+5:30
Viral Dish : बऱ्याचदा असं होतं की, आपण नवीन काहीतरी ऑर्डर करतो आणि नंतर समोर जे येतं ते चक्रावून टाकणारं असतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं.

VIDEO : मेन्यूकार्ड बघून व्यक्तीने नवीन डिश केली ऑर्डर, वेटरने समोर ताटात आणून ठेवले 'महिलेचे ओठ'
Viral Dish : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मेन्यू कार्ड बघणं आणि काहीतरी ऑर्डर करणं ही काम फारच कंटाळवाणं असतं. कारण त्यात इतके मेन्यू असतात की, काय ऑर्डर करावं लगेच काही कळत नाही. बरं त्यात काही नावं इतकी नवीन असतात की, त्याबाबत उत्सुकता तर वाढतेच सोबतच कन्फ्यूजनही व्हायला होतं. बऱ्याचदा असं होतं की, आपण नवीन काहीतरी ऑर्डर करतो आणि नंतर समोर जे येतं ते चक्रावून टाकणारं असतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. त्याने मोठ्या उत्साहाने ‘Chef’s Kiss’ नावाची डिश ऑर्डर केली. जशी प्लेटसमोर आली तो बघून अवाक् झाला.
आपल्याला कदाचित माहीत नसेल की, Chef’s Kiss शब्दाचा वापर सामान्यपणे एखाद्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी केला जातो. पण एका रेस्टॉरन्टमध्ये या शब्दाला खरंच डिशचं रूप दिलं. या व्यक्तीचं लक्ष मेन्यू कार्डमधील ‘Chef’s Kiss’डिशवर गेलं आणि त्याने ती डिश ऑर्डर केली. ज्यासाठी त्याला ७२५ रूपये मोजावे लागले.
त्याला वाटलं असेल की, काहीतरी टेस्टी ताटात वाढलं जाईल, पण जसा वेटर प्लेट घेऊन आला, तसं सगळंच बदललं. प्लेटच्या मधोमध गुलाबी रंगाचे मोठे मोठे ओठ ठेवले होते. जे खरंच मनुष्यांच्या ओठांसारखे दिसत होते. प्लेटमध्ये ओठ पाहून व्यक्तीही अवाक् झाली आणि त्याला हसू येऊ लागलं.
खरंतर ही एक खासप्रकारची मिठाई असते. एक खास डेजर्ट. जे रेड बेरी सोरबेट आणि चॉकलेटपासून तयार केलं जातं. याला पूर्णपणे ओठांचा आकार देण्यात आला. व्हिडीओ बघून लोकांनी सुद्धा अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'असं वाटतं शेफ जरा जास्तच इमोशनल झालाय'. तर कुणी म्हणालं की, 'आता हे खाल्ल्यानंतर घरी कसा जाणार?'.