डॅन बिलझेरियन हा इन्स्टाग्राम स्टार नुकताच भारतात येऊन गेला. त्याने भारतातील कलाकारांसाठी एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. डॅन हा एक बिझनेसमन सेलिब्रिटी असून तो त्याच्या हाय-फाय लाइफस्टाईलसाठी चांगलाच लोकप्रिय आहे. त्याच्या अवती-भोवती सतत अप्सरांचा गराडा असतो. जर तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम पेजला भेट दिली तर ते तुम्हाला बघायला मिळेलच. पण सध्या त्याच्या घड्याळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

वेगवेगळ्या वस्तूंची आवड असणारी अनेक लोकं आपण पाहिली-ऐकलेली असतात. त्यांच्या महागड्या वस्तूंचीही नेहमी चर्चा होते. तशीच डॅनच्या खास घड्याळीची चर्चा रंगली आहे. असे म्हणतात की, त्याच्या या घड्याळाची किंमत दिल्ली एक व्हिलाच्या किंमतीपेक्षा अधिक आहे.

डॅन बिलझेरियनची नुकतीच दिल्लीमध्ये एक पार्टी झाली. त्यावेळी त्याने Richard Mille RM11-03 ही घड्याळ घातली होती. या घड्याळाचा कंपनीकडून केवळ ५०० मॉडेल्स तयार करण्यात आले होते. म्हणजे काय तर या घड्याळाचे लिमिटेड एडिशन होते. कंपनीच्या काही खास रेग्युलर ग्राहकांसाठीच ही घड्याळ तयार करण्यात आली आहे. त्यातीलच एक डॅन होता. 

आता या घड्याळाची किंमत जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेलच. तर या घड्याळाची किंमत $191,500 इतकी आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 1,36,00,000 इतकी होते. आता या घड्याळाचे लिमिटेड मॉडेल्सच असल्याने याची किंमत आणखीनच वाढलेली आहे. काही लोक ही घड्याळ रिसेलिंगमध्ये 2.5 कोटी रूपयांना विकत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: King of Instagram Dan Bilzerian is in India wears watch worth Rs 1,36,00,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.