Viral Video: झाडावर चढण्यासाठी किंग कोब्रांमध्ये झटापट, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 19:38 IST2022-05-15T19:36:17+5:302022-05-15T19:38:20+5:30
अनेक वेळा हे साप आपसातच भांडत असल्याचंही पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ (Cobra Fight Video) व्हायरल होत आहे.

Viral Video: झाडावर चढण्यासाठी किंग कोब्रांमध्ये झटापट, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप
तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. साप पाहून भल्याभल्यांची अवस्था वाईट होते. साप हा असा प्राणी आहे, ज्याच्या चाव्याने माणसाचा जीवही जाऊ शकतो. साप पाहून बहुतेक लोक पळून जातात तर अनेकांनी लांब साप दिसला तरी घाम फुटतो. किंग कोब्रा हा सापांमध्ये सर्वात धोकादायक मानला जातो. अनेक वेळा हे साप आपसातच भांडत असल्याचंही पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राच्या लढाईचा असाच एक व्हिडिओ (Cobra Fight Video) व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये अनेक किंग कोब्रा एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी लढत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे अनेक किंग कोब्रा एकत्र दिसत आहेत, हे दृश्य सहसा पाहायला मिळत नाही. इन्स्टाग्रामवर snake._.world या अकाऊंटवरून व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये एका मोकळ्या मैदानात एक छोटं झाड असल्याचं दिसतं. या झाडाच्या फांदीवर चढण्यासाठी अनेक किंग कोब्रा भांडताना दिसतात. हे सर्व किंग कोब्रा एकमेकांना चिकटून बसलेले दिसत आहेत. यादरम्यान ते एकमेकांशी भांडतानाही दिसत आहेत. हे थक्क करणारं दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.