'या' चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुमचं टेन्शनही दूर होईल अन् खदखदून हसायला लागाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:50 IST2020-03-05T12:31:37+5:302020-03-05T12:50:00+5:30
आतापर्यंत तब्बल २७ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर ७३ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आणि ९२ हजार लोकांनी शेअर केलाय.

'या' चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुमचं टेन्शनही दूर होईल अन् खदखदून हसायला लागाल!
सध्या चौकाचौकात, गल्ली बोळांमध्ये केवळ कोरोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. अशात तुम्ही टेन्शन आणि थकवा दूर करायचा असेल तर हा क्यूट मुलाचा व्हिडीओ बघू शकता. कोरोनाच्या टेन्शनमध्ये लोक हा व्हिडीओ पाहून मन हलकं करत आहेत. हा व्हिडीओ किती क्यूट आहे हे यावरून कळेल की, आतापर्यंत तब्बल २७ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर ७३ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आणि ९२ हजार लोकांनी शेअर केलाय.
हा व्हिडीओ Alixandia Smith नावाच्या फेसबुक यूजरने २६ जानेवारीला शेअर केला होता. तसा हा व्हिडीओ जुनाच आहे. पण व्हायरल आता झाला आहे. मात्र, एवढं नक्की की, हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्या हसू नक्कीच फुलेल. यात एक चिमुकला कुत्र्यासोबत गप्पा करताना दिसत आहे.
या व्हिडीओत चिमुकला त्याच्या हस्की डॉगीसोबत त्याच्या स्टाइलने गप्पा करतो आहे. एकदा मुलगा आवाज काढतो तर दुसऱ्यावेळी कुत्रा. हे करताना हा लहान मुलगा खदखदून हसतो. हे पाहून आपल्यालाही हसू आवरता येत नाही.