बाबो! ज्या सायरनच्या आवाजाने तुम्हाला येतो वैताग, त्यावर या मुलाने केला अफलातून डान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:25 IST2019-08-10T16:08:36+5:302019-08-10T16:25:17+5:30
कधी-कधी या सायरनच्या आवाजामुळे खूप वैतागही येतो. पण एका मुलाने या सायरनच्या ट्यूनवर असा काही डान्स केला की, तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

बाबो! ज्या सायरनच्या आवाजाने तुम्हाला येतो वैताग, त्यावर या मुलाने केला अफलातून डान्स!
चोरी होऊ नये म्हणून काही कार्स आणि बाइक्समध्ये सिक्युरिटी सायरन लावला जातो. एखाद्या अनोळखी व्यक्ती गाडीला हात लावला तर हा सायरन जोरजोरात वाजू लागतो. कधी-कधी या सायरनच्या आवाजामुळे खूप वैतागही येतो. पण एका मुलाने या सायरनच्या ट्यूनवर असा काही डान्स केला की, तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ३५ सेकंदाच्या या व्हिडीओत लहान मुलगा अफलातून डान्स करताना दिसतोय. त्याचे डान्स मुव्ह्स खरंच बघण्यासारखे आहेत. कदाचित तुम्ही या ट्यूनवर असा डान्स होऊ शकेल याची कल्पनाही केली नसेल.
हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. महिंद्रा यांनी शुक्रवारी हा व्हिडीओ ट्विट केला होता. ही बातमी लिहून होईपर्यंत ५०९.४ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ५६ हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय. तर १३ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.
Oh man, this has to be the coolest thing I’ve seen in a long time. I’m still on the floor laughing. My weekend has begun... pic.twitter.com/eYC4MKXRDk
— anand mahindra (@anandmahindra) August 9, 2019