कपिल देव आता रणवीर सिंगच्या भूमिकेत, स्वत:च्या बायोपिक आधी रणवीरचा बायोपिक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 21:13 IST2021-10-22T21:07:41+5:302021-10-22T21:13:03+5:30

सध्या रणवीर सिंगच्या भूमिकेतील कपिल देव इंटरनेटवर व्हायरल होतायत. त्यांनी स्वत: च हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

kapil dev mimics ranveer singh netizens responds with hilarious memes | कपिल देव आता रणवीर सिंगच्या भूमिकेत, स्वत:च्या बायोपिक आधी रणवीरचा बायोपिक रिलीज

कपिल देव आता रणवीर सिंगच्या भूमिकेत, स्वत:च्या बायोपिक आधी रणवीरचा बायोपिक रिलीज

रणवीर सिंग त्याच्या पुढील चित्रपट 83 मध्ये कपिल देव या महान क्रिकेट खेळाडूची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंग हा अभिनेता असल्याने त्याने कपिल देव यांचा अभिनय करणे त्याला शक्य आहे. पण तुम्ही कधी कल्पना करु शकता का? की कपिल देव हे कधी रणवीर सिंगच्या भूमिकेत दिसतील. आश्चर्य वाटून घेऊ नका पण हे खरं आहे. सध्या रणवीर सिंगच्या भूमिकेतील कपिल देव इंटरनेटवर व्हायरल होतायत. त्यांनी स्वत: च हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्हाला कपिल देव रणवीर सिंग ज्यापद्धतीने झटकमटक कपडे घालतो तश्या कपड्यांमध्ये दिसतात. सुरुवातीला, ते क्रिकेटपटू म्हणून मैदानात गुलाबी पोशाखात टाळ्या वाजवताना दिसतात. त्यानंतर ते अनेक चमकदार, चित्र विचित्र अशा पेहरावात दिसतात. त्यांनी या व्हिडिओमध्ये चक्क स्कर्ट घालुन बॉलिंगही केली आहे.

जेव्हापासून कपिल देव यांची ही जाहिरात व्हायरल झाली आहे, तेव्हापासून व्हिडीओवर बर्‍याच मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत १.७ मिलियनहुन अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी, लोक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिम्सचाही पाऊस पडत आहेत.

Web Title: kapil dev mimics ranveer singh netizens responds with hilarious memes