Video - तुफान राडा! एकीने चप्पल काढली तर दुसरीने बाटली: मेट्रोत 2 मुलींमध्ये जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 01:08 PM2023-03-30T13:08:24+5:302023-03-30T13:09:11+5:30

मेट्रोच्या महिला कोचमध्ये दोन मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जागेवरून दोघींमध्ये वाद झाल्याचा दावा करण्यात आला.

kalesh between two girls inside metro over seat issue watch woman chappal bottle fight video | Video - तुफान राडा! एकीने चप्पल काढली तर दुसरीने बाटली: मेट्रोत 2 मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Video - तुफान राडा! एकीने चप्पल काढली तर दुसरीने बाटली: मेट्रोत 2 मुलींमध्ये जोरदार हाणामारी

googlenewsNext

'रोमान्स'पासून 'थ्रिल'पर्यंत सर्व काही दिल्ली मेट्रोच्या प्रवासादरम्यान पाहायला मिळतं. यावेळी मेट्रोच्या महिला कोचमध्ये दोन मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जागेवरून दोघींमध्ये वाद झाल्याचा दावा करण्यात आला. व्हायरल क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुणी आपली चप्पल काढून दुसर्‍या मुलीकडे जात आहे आणि धडा शिकवेन असं म्हणत आहे. तर दुसरी मुलगी हातात स्टीलची बाटली घेऊन मुलीपर्यंत पोहोचली आहे. 

दोन्ही मुली एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात. दोघीही एकमेकींना अपशब्द वापरतात. त्याचवेळी इतर महिला प्रवाशांनी या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकीने याबाबत मेट्रो प्रशासनाकडे तक्रारही केली आहे. मेट्रोमध्ये महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील असे अनेक व्हि़डीओ व्हायरल झाले आहेत. 

gharkekalesh या हँडलवरून 'दिल्ली मेट्रो'चा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. त्याने कॅप्शनमध्ये मेट्रोमध्ये सीटवरून दोन महिलांमध्ये भांडण असं म्हटलं आहे. या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 41 हजारांहून अधिक व्ह्यूज, 1600 हून अधिक लाईक्स आणि सुमारे दोनशे रिट्विट्स मिळाले आहेत. याशिवाय सर्व युजर्सनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: kalesh between two girls inside metro over seat issue watch woman chappal bottle fight video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.