Kachha Amrood: 'कच्चा बादाम' विसरा, आता 'कच्चा अमरुद'चं रीमिक्स व्हर्जन इंटरनेटवर होतंय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:19 IST2022-03-23T16:08:39+5:302022-03-23T16:19:40+5:30
'कच्चा बादाम' गाण्यानंतर आता 'कच्चा अमरुद' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kachha Amrood: 'कच्चा बादाम' विसरा, आता 'कच्चा अमरुद'चं रीमिक्स व्हर्जन इंटरनेटवर होतंय व्हायरल
Viral Video: आजकाल सोशल मीडियावर काहीही व्हायरल होत आहे. 'कच्चा बदाम' हेच गाणे घ्या, या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या गाण्यातून बंगालचा एक सामान्य शेंगदाणा विक्रेता रातोरात इंटरनेट सेंसेशन बनला. त्यानंतर आता आता 'कच्चा अमरुद' हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. काही दिवसांपूर्वी 'कच्चा अमरुद'चा(Kachha Amrood Remix) व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, आता त्यावर रीमिक्स गाणे बनवण्यात आले असून, लोकांनाही ते खूप आवडत आहे.
काही दिवसांपूर्वीच गल्लीबोळात पेरू विकणाऱ्या काकाचा म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्या गाण्याचे रीमिक्स व्हर्जन नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. कालपर्यंत रस्त्यावर पेरू विकणारे काक आता सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता नेटकरी 'कच्चा आंबा' गाण्याची मागणी करत आहेत.
'कच्चा अमरुद' हे गाणे 14 मार्च रोजी रिलीज झाले असून, लोकांना खूप आवडत आहे. व्हिडीओ पाहून युजर्सही यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला चांगलेच लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. त्यामुळे आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉरमवर कच्चा बादामनंतर कच्चा अमरुद गाणे पाहण्यासाठी तयार रहा.