ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:06 IST2025-07-28T16:05:47+5:302025-07-28T16:06:15+5:30

Dog Babu Residence Certificate: बिहारची राजधानी पाटणा येथे अधिकाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका कुत्र्याच्या नावाने निवासी प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

It's amazing to hear! Name is Dog Babu, father is Kutta Babu and mother is Kutiya Devi; Residence certificate made for the dog | ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

बिहारमध्ये काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहिवासी प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षणाची मोहिम वाढवली आहे. दरम्यान, आता निवासी प्रमाणपत्रांसाठी अर्जांचा पूर आला होता. सरकारने निवासी प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची माहिती देखील दिली होती. सीमांचल जिल्ह्यांमध्ये निवासी प्रमाणपत्रे देण्यापूर्वी विशेष चौकशी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. पण पाटणा जिल्ह्यातून निवासी प्रमाणपत्रांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video

मसौरी ब्लॉकमध्ये एका कुत्र्याला रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुत्र्याचे रहिवासी प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली. प्रत्यक्षात, हे रहिवासी प्रमाणपत्र पाटणा जिल्ह्यातील मसौरी क्षेत्रीय कार्यालयातून देण्यात आले आहे. आरटीपीएस काउंटरद्वारे दिले जाणारे हे रहिवासी प्रमाणपत्र कुत्र्याचा फोटो टाकून आणि त्याचे नाव आणि पत्ता देऊन जारी करण्यात आले.

कुत्र्याचे संपूर्ण नाव प्रमाणपत्रावर 

२४ जुलै रोजी आरटीपीएस काउंटरने हे निवास प्रमाणपत्र जारी केले. त्याचा क्रमांक बीआरसीसीओ २०२५/१५९३३५८१ आहे. त्यावर महसूल अधिकारी मुरारी चौहान यांची डिजिटल स्वाक्षरी देखील आहे. या निवास प्रमाणपत्रात अर्जदाराचे नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू, आई कुटिया देवी आणि कौलीचक वॉर्ड १५ मसौरी असे लिहिले आहे.

या प्रमाणपत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अर्जदाराच्या फोटोऐवजी कुत्र्याचा फोटो वापरण्यात आला आहे. हे वादग्रस्त प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर विभागीय अधिकारी जागे झालेत. संपूर्ण प्रकरण समजल्यानंतर, रविवारी संध्याकाळी आरटीपीएस पोर्टलवर अपलोड केलेले हे वादग्रस्त निवासी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. यासोबतच, महसूल अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी देखील काढून टाकण्यात आली आहे.

Web Title: It's amazing to hear! Name is Dog Babu, father is Kutta Babu and mother is Kutiya Devi; Residence certificate made for the dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.