सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:34 IST2025-12-16T15:31:36+5:302025-12-16T15:34:39+5:30
Maggi Capsule fact check: सोशल मीडियावरील दोन व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले आहेत. दोन वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये मॅगी कॅप्सूलपासून नूडल्स बनवताना दिसत आहेत.

सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
Maggi Capsule News: सोशल मीडियावर फिरत असलेल्या दोन व्हिडीओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतले. एका व्हिडीओमध्ये तरुणी मॅगी कॅप्सूल दाखवून त्यापासून न्यूडल्स तयार करत आहे. असेच एक तरुण दुसऱ्या व्हिडीओमध्ये करत आहेत. पण, मॅगी कंपनीने खरंच अशी कॅप्सूल बनवलीये का? याबद्दलच जाणून घ्या.
सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करत उत्पादनांचे व्हिडीओ दिसतात. असेच व्हिडीओ आता मॅगी न्यूडल्सबद्दल फिरत आहेत. मॅगी इंडिया कंपनीने आता मॅगी कॅप्सूल बनवले आहेत आणि काही सेकंदामध्ये नूडल्स तयार होतात, असा दावा या व्हिडीओमधून केला जात आहे.
व्हिडीओमध्ये ते मॅगी कॅप्सूल दाखवतात. त्यानंतर उकळत्या पाण्यात टाकतात आणि कॅप्सूल फुटत आणि न्यूडल्स तयार होतात, असे व्हिडीओमध्ये दिसते.
Viral yippee Maggie Capsule pic.twitter.com/krNZEka5Dv
— RK Adda (@rkada45) December 11, 2025
मॅगी न्यूडल्स कॅप्सूलचे सत्य काय?
सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेणारे हे व्हिडीओ खरे वाटत असले, तरी ते खरे नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे एआयचा वापर करून हे व्हिडीओ तयार करण्यात आलेले आहेत.
खुद्द कंपनीनेच हे व्हिडीओ करणाऱ्यांना उपरोधिक भाषेत सुनावले आहे. या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये मॅगी इंडियाने म्हटले आहे की, 'इतर महिन्यांमध्ये एप्रिल फूल दिवस साजरा करू नका.'
इतर लोकांनीही या व्हिडीओखाली कमेट केल्या आहेत. एआयच्या गैरवापराबद्दल काही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यूडल्स त्याच्या तोंडात जाताच अदृश्य होतात म्हणजेच हा व्हिडीओ खरंच खरा आहे, असे काहींनी उपरोधिकपणे सुनावले आहे.