भाषण ऐकताना तंबाखू मळणाऱ्यानं हातावर थाप मारली अन् 'जे' झालं ते पाहून हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 17:41 IST2020-08-14T17:33:12+5:302020-08-14T17:41:36+5:30
हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीयो ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे.

भाषण ऐकताना तंबाखू मळणाऱ्यानं हातावर थाप मारली अन् 'जे' झालं ते पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर अनेक गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखाद्या पदार्थांचे व्यसन असल्यास तलफ लागल्यानंतर काय काय होऊ शकतं. हे तुम्हाला ठाऊक असेलच. सोशल मीडियावर सध्या असाच एक तंबाखू मळत असलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीयो ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भाषण ऐकताना एक व्यक्ती तंबाखू मळत आहे. तंबाखू मळताना हातांवर जोरात हात मारत आहे. जसं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल तंबाखू खाणारी व्यक्ती तंबाखू हातात घेऊन टाळ्या वाजवल्याप्रमाणे कृती करते. या माणसाच्या हातांचा आवाज ऐकून बसलेल्या सगळ्यांना टाळ्या वाजवण्याचा आवाज आला आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली.
Such a blessing to have a legend like this in your audience 😂 pic.twitter.com/OCTuU0p7xW
— Arun Bothra (@arunbothra) August 14, 2020
नकळतपणे तंबाखू मळण्याचा आवाज ऐकून लोकांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली. अशात सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे भाषण करत असलेल्या व्यक्तीचं मनोबलं नक्कीच वाढलं असेल.अरूण बोथरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला तुफान प्रसिसाद दिला आहे. या व्हिडीओला ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स ८०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पोट धरून हसू लागले आहेत.
हे पण वाचा-
रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण
बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!