पापड विकणाऱ्या मुलाला इन्फ्लुएन्सर देत होता ५०० रूपये, त्याचा रिप्लाय ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:46 IST2025-01-23T11:45:48+5:302025-01-23T11:46:41+5:30

Viral Video : सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक पापड विकणारा छोटा असं काही बोलला, जे ऐकून तुम्हालाही त्याचं कौतुक वाटेल.

Influencer wants to give rs 500 to little boy selling papad kid refused to take money watch his reply | पापड विकणाऱ्या मुलाला इन्फ्लुएन्सर देत होता ५०० रूपये, त्याचा रिप्लाय ऐकून व्हाल थक्क!

पापड विकणाऱ्या मुलाला इन्फ्लुएन्सर देत होता ५०० रूपये, त्याचा रिप्लाय ऐकून व्हाल थक्क!

Viral Video : बरीच लहान मुलं किंवा मुली अशा असतात ज्यांना बालपणीच आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यावी लागते. ज्यामुळे बालपणीच त्यांच्यात स्वाभिमान ठासून भरलेला असतो. अनेकदा लहान मुलं असं काही बोलून जातात, जे मनाला चांगलंच भिडतं. सोबतच जीवनाचा सार सांगणारी शिकवणी देऊन जातं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक पापड विकणारा छोटा असं काही बोलला, जे ऐकून तुम्हालाही त्याचं कौतुक वाटेल.

जे लोक आळशी असतात किंवा ज्यांना आरामात मेहनतीशिवाय पैसे कमवायचे असतात, अशा लोकांसाठी या लहान मुलाचं बोलणं जणू चपराकच आहे. इतक्या लहान वयात इतका समजदारपणा कुठून येतो असा प्रश्नही पडेल. आपण विकत असलेल्या मालासाठी १ रूपयाही जास्त न घेणं हे तर एखादी इमानदार व्यक्तीच करू शकते. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलगा इन्फ्लुएन्सरला म्हणतो की, दादा, पापड विकले जात नाहीयेत. तर इन्फ्लुएन्सर म्हणतो, ५ रूपयाचे दे. त्यावर मुलगा म्हणतो की, दादा ५ रूपयात नाही. पुढे इन्फ्लुएन्सर त्याला विचारतो की, तू तुझ्या आईवर प्रेम करतो का? यावर हो करतो असं उत्तर मुलगा देतो. तर इन्फ्लुएन्सर म्हणतो की, मी सुद्धा माझ्या आईवर प्रेम करतो. माझी आई तुझी आई नाही का? हे ऐकून मुलगा ३० रूपयांचा पापड ५ रूपयांना द्यायला तयार होतो. नंतर जेव्हा इन्फ्लुएन्सर परत येतो, तेव्हा म्हणतो की, तुझे पापड माझ्या आईला खूप आवडले. हे म्हणत तो मुलाला ५०० रूपये देऊ लागतो. यावर मुलगा जे काही बोलतो ते मनाला भिडतं.

५०० रूपये बघून मुलगा म्हणतो, दादा इतके पैसे मी नाही घेऊ शकत. फक्त पापडाची किंमत घेईन. इन्फ्लुएन्सर म्हणतो की, अरे तू माझ्या आईला पापड दिले. हे माझ्याकडून तुझ्या आईसाठी ठेव. हे ऐकून मुलगा म्हणतो, दादा मी काम करतो. भीक मागत नाहीये. दुसऱ्याचे पैसे का घेऊ. हे ऐकून इन्फ्लुएन्सर हैराण होतो आणि ५९ सेकंदाची क्लीप इथेच संपते.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @motivation_melega नावाच्या यूजरनं शेअर केली आहे. कॅप्शनला लिहिलं आहे की, छोटू खूप मोठी गोष्ट बोलून गेला. या व्हिडिओला आतापर्यंत ७९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि १२ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट्स करून लहान मुलाचं भरभरून कौतुक करत आहेत.

Web Title: Influencer wants to give rs 500 to little boy selling papad kid refused to take money watch his reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.