इन्फ्लुएन्सर एका दिवसासाठी बनला भिकारी, दिवसभराची कमाई बघून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:32 IST2025-01-22T16:31:40+5:302025-01-22T16:32:15+5:30

Viral Video : एक भिकारी दिवसभर भीक मागून किती पैसे कमावतात हे नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. कारण भिकारी किती श्रीमंत असतात हे वेळोवेळी समोर येत असतं.

Influencer turns beggar to know per day income of beggars | इन्फ्लुएन्सर एका दिवसासाठी बनला भिकारी, दिवसभराची कमाई बघून व्हाल अवाक्!

इन्फ्लुएन्सर एका दिवसासाठी बनला भिकारी, दिवसभराची कमाई बघून व्हाल अवाक्!

Viral Video : सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळ्या प्रकारचा कंन्टेट बघायला मिळतो. कधी मजेदार, तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही वेगळा कंन्टेट पोस्ट करत असतात. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एक दिवसासाठी भिकारी बनला. कारण त्याला हे जाणून घ्यायचं होतं की, भिकारी दिवसभरात किती पैसे गोळा करतात. एक दिवस भिकारी बनून त्यानं किती पैसे जमा केले ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

एक भिकारी दिवसभर भीक मागून किती पैसे कमावतात हे नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. कारण भिकारी किती श्रीमंत असतात हे वेळोवेळी समोर येत असतं. अशात त्यांची कमाई जाणून घेण्यासाठी या तरूणानं एक वेगळी टेस्ट केली. त्याने मंदिर, मॉल ट्रॅफिक सिग्नल, रेल्वे स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागितली. पण हे करत असताना या तरूणाला जो अनुभव आला, ती केवळ एक भिकारीच समजू शकतो. दिवसभर भीक मागूनही या व्यक्तीनं १०० रूपयांचा आकडाही पार केला नव्हता. 

सगळ्यात आधी तरूण भिकारीच्या लूकमध्ये ट्रॅफिक सिग्नलवर गेला, इथे ३० मिनिटं त्याच्याकडे कुणी पाहिलं सुद्धा नाही. त्यानंतर तो जागा बदलून मंदिरात गेला. इथे त्याला १० रूपये भीक मिळाली. त्यानंतर एका महिलेने त्याला ३० रूपये दिले. हे करत असताना एका व्यक्तीनं त्याला तिथून जाण्यास सांगितलं. मग तरूणी मॉलजवळ गेला. इथे त्याला २० रूपये भीक मिळाली. शेवटी तो रेल्वे स्टेशनवर गेला. इथेही त्याला १० रूपये मिळाले. दिवसभर भीक मागून त्यानं ९० रूपये गोळा केले.

या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेक लोकांनी मजेदार कमेंट्स करून त्याला चिमटा काढला आहे. एकानं लिहिलं की, 'वाचलास भावा...पोलिसांनी पकडलं नाही'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'इतका कॉन्फिडन्स कुठून आणतो भाऊ'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'भावा, तुझा हा अनुभव तुझ्या सीव्हीमध्ये टाकशील'. या पोस्टला आतापर्यंत ७६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर २.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title: Influencer turns beggar to know per day income of beggars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.