इन्फ्लुएन्सरने रेड लाइट एरियात महिलेसोबत घालवला दिवस, व्हिडीओ बघून भावूक झाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:53 IST2024-12-25T14:53:24+5:302024-12-25T14:53:51+5:30

Life of Prostitute in Red Light Area : इथे त्याने एक सेक्स वर्कर आणि त्याची सोशल मीडिया फॉलोअर रॉक्सीसोबत एक दिवस घालवला. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Influencer spends whole day in red light with prostitute shows her life | इन्फ्लुएन्सरने रेड लाइट एरियात महिलेसोबत घालवला दिवस, व्हिडीओ बघून भावूक झाले लोक!

इन्फ्लुएन्सरने रेड लाइट एरियात महिलेसोबत घालवला दिवस, व्हिडीओ बघून भावूक झाले लोक!

Life of Prostitute in Red Light Area : सोशल मीडियावर वेगवेगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहमीच लोकांच्या जीवनातील संघर्षाच्या कहाणी समोर आणत असतात. एका इन्फ्लुएन्सरने अशीच एक मनाला भावणारी कहाणी समोर आणली आहे. इन्फ्लुएन्सर अनीश भगतने भारतातील सगळ्यात प्रसिद्ध रेड-लाइट एरियापैकी एकाला भेट दिली. इथे त्याने एक सेक्स वर्कर आणि त्याची सोशल मीडिया फॉलोअर रॉक्सीसोबत एक दिवस घालवला. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओच्या सुरूवातीलाच भगतने रॉक्सीला भेटणार असल्याचं सांगितलं. तो तिला भेटतो आणि थोड्या गप्पांनंतर रॉक्सीने त्याला तिच्या फ्लॅटवर बोलवलं. रॉक्सीने त्याला तिचं पूर्ण घर दाखवलं. तिने त्याला तिची रूमही दाखवली. ती म्हणाली की, 'ही माझी रूम आहे. मी कधीच कुणाला इथे आणत नाही. तू पहिला आहेस'.


गप्पा सुरू असताना रॉक्सी तिच्या भूतकाळाबाबत सांगते. 'माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे काका मला नोकरी मिळवून देण्यासाठी इथे घेऊन आले होते. त्याने मला विकलं. ती इमोशनल होऊन सांगते की, आता तर वेदनाही होत नाही'.

रॉक्सीला लिहिण्या-वाचण्याची सवय आहे. ती आजूबाजूच्या मुलांची ट्यूशनही घेते. ती अभिमानाने सांगते की, तिची मुलगी इंग्रजी मीडियममध्ये शिकते. जी तिच्या कठोर जीवनाच्या वास्तवापासून दूर आहे.

भगत तिला विचारतो की, तो तिच्यासाठी काय करू शकतो? तर ती सुशी खाण्याची ईच्छा व्यक्ती करते. व्हिडिओच्या शेवटी दोघेही सोबत डिनरला जातात. हा क्षण तिच्या संघर्षामधील आनंद दर्शवतो. 

हा इमोशनल व्हिडीओ लोकांना खूप आवडला. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'आपण सगळ्यांनीच तिच्याकडून काही शिकलं पाहिजे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'अनीश भगत, तू तुझ्या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या कामासाठी केला आहे'. लोकांनी रॉक्सीचा स्वभाव आणि भगतच्या मानवतेचं कौतुक केलं आहे.

Web Title: Influencer spends whole day in red light with prostitute shows her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.