जबरदस्त! भारतीय तरूणीने 140 भाषांमध्ये गायलं गाणं, वर्ल्ड रेकॉर्ड केला आपल्या नावावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:49 IST2024-01-08T14:49:21+5:302024-01-08T14:49:47+5:30
Guinness Book of World Records :या तरूणीचं नाव सुचेता सतीश आहे. तिने यूएईम दुबईमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये गाणं गाउन रेकॉर्ड कायम केला.

जबरदस्त! भारतीय तरूणीने 140 भाषांमध्ये गायलं गाणं, वर्ल्ड रेकॉर्ड केला आपल्या नावावर
Guinness Book of World Records : एका भारतीय तरूणीने 140 भाषांमध्ये गाणं गात वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. ही तरूणी केरळ राज्यातील राहणारी आहे. तिच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरूणीचं नाव सुचेता सतीश आहे. तिने यूएईम दुबईमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये गाणं गाउन रेकॉर्ड कायम केला.
कॉन्सर्टचं नाव 'कॉन्सर्ट ऑफ क्लाइमेट' होतं. हा इव्हेंट 24 नोव्हेंबर 2023 ला झाला. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात सुनीताचा सुरेल आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो.
हा व्हिडीओ ऑल इंडिया रेडिओने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं की, केरळच्या सुचेता सतीशने एका इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त भाषांमध्ये गाणं गाउन वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. याद्वारे तिने म्युझिक विश्वात आपलं नाव नोंदवलं आहे.
#GuinnessBookofWorldRecords ने या आठवड्याच्या सुरूवातीला या रेकार्डबाबत माहिती दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, सुचेताने दुबईच्या वाणिज्य दूतावासात जलवायु परिवर्तनसंबंधी जागरूकतेसंबंधी 140 भाषांमध्ये एक गाणं गायलं.
तेच आता जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. लोक याला शेअर आणि लाइक करत आहेत. सोबतच कमेंट करून वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. लोक सुचेताचं कौतुक करत आहेत.