Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 14:12 IST2025-12-10T14:11:33+5:302025-12-10T14:12:42+5:30

Indian Couple Viral Video: जोडप्याचा हायवेवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रया दिल्या.

Indian Couple Cooks Food On Highway, Video Goes Viral On Social Media | Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...

Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...

सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन आणि कधीकधी धक्कादायक गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका जोडप्याने चक्क हायवेच्या कडेला आपली कार पार्क करून रस्त्यावरच आपले स्वयंपाक करायला सुरूवात केली आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, अशा कृत्यांमुळेच रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे रस्त्याच्या अगदी कडेला आपली कार उभी करून रस्त्यावरच स्वयंपाक करताना दिसत आहे. महिला रस्त्याच्या कडेला चपात्या बनवत आहे, तर दुसरीकडे भाज्या शिजवल्या जात आहेत. जेव्हा या जोडप्याला त्यांच्या या कृतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हे 'विश्रांती क्षेत्र' असून, येथे स्वयंपाक करण्याची परवानगी असल्याचा दावा केला.

हा व्हिडिओ @Nalanda_index नावाच्या अकाउंटवरून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या जोडप्यावर जोरदार टीका केली आहे. नेटकऱ्यांनी या कृतीला बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले आहे. हायवेवर अशाप्रकारे स्वयंपाक करणे हे केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतर वाहनचालकांसाठीही धोकादायक ठरू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.

नेटकऱ्यांचा संताप

या व्हिडीओवर कमेंट करताना एका म्हटले आहे की, "भारतासारख्या देशात नागरिकांची जाणीव ही खूप महागडी गोष्ट आहे, जी प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही." अनेक लोकांनी "सार्वजनिक ठिकाणांचा योग्य वापर करणे आणि स्वच्छता राखणे ही केवळ नियम नाही, तर आपली जबाबदारी आहे.", अशी कमेंट केली आहे.

Web Title : दंपति ने हाईवे पर खाना बनाया, आक्रोश, सुरक्षा चिंताएं बढ़ीं।

Web Summary : एक वायरल वीडियो में एक दंपति हाईवे पर खाना बनाते हुए दिख रहे हैं, जिससे आक्रोश फैल गया है। आलोचकों ने सुरक्षा जोखिमों और यातायात में बाधा का हवाला दिया। दंपति ने दावा किया कि यह एक निर्धारित विश्राम क्षेत्र था। इस घटना ने सार्वजनिक सुरक्षा और नागरिक जिम्मेदारी की उपेक्षा को उजागर किया, जिससे ऑनलाइन कड़ी प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Couple cooks on highway, sparking outrage and safety concerns.

Web Summary : A viral video shows a couple cooking on a highway, sparking outrage. Critics cite safety risks and traffic obstruction. The couple claimed it was a designated rest area. The incident highlights disregard for public safety and civic responsibility, drawing strong reactions online.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.