भारतीय जवानांचा सापांसोबत ट्रेनिंगचा खतरनाक व्हिडीओ, बघून अंगावर येईल शहारे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:14 IST2024-07-04T12:04:16+5:302024-07-04T12:14:10+5:30

सध्या भारतीय सैनिकांच्या ट्रेनिंगचा छोटासा भाग दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Indian army jawan training with snake in commando school watch viral video | भारतीय जवानांचा सापांसोबत ट्रेनिंगचा खतरनाक व्हिडीओ, बघून अंगावर येईल शहारे!

भारतीय जवानांचा सापांसोबत ट्रेनिंगचा खतरनाक व्हिडीओ, बघून अंगावर येईल शहारे!

भारतीय सैनिकांच्या हिंमतीवर आणि पराक्रमांवर देशभरातील लोकांना अभिमान असतो. भारतीय सैन्य दल हे जगातील सगळ्यात शक्तीशाली सैन्य दलांपैकी एक आहे. सैनिकांची शिस्त आणि त्यांचं ट्रेनिंग फारच अवघड असतं. सध्या भारतीय सैनिकांच्या ट्रेनिंगचा छोटासा भाग दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही सैनिकांना सापांसोबत ट्रेनिंग करताना बघू शकता. 

हा व्हिडीओ X वर @LevinaNeythiri नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, जेव्हा एखादा साप तुमच्या शरीरावर सरपटत असेल तर शांत रहा. हेच कारण आहे की, आपले सैनि जंगल वॉर फेअरमध्ये इतके चांगले आहेत. X यूजरनुसार, हा व्हिडीओ बेळगाव कमांडो ट्रेनिंग स्कूलमधील आहे.

यूजरने पुढे सांगितलं की, सैनिकांसाठी ही अॅक्टिविटी एक मजेदार अॅक्टविटी असते. कारण साप तुम्हाला नुकसान पोहोचवत नाहीत. सैनिकांचं धैर्य तपासणाऱ्या या ट्रेनिंग क्लिपवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

एका यूजरने लिहिलं की, तुम्ही सीरिअस आहात का? हा व्हिडीओ बघून मी घाबरलो आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, आर्मी मॅन महान सैनिक असतात. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाख ३० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे.

Web Title: Indian army jawan training with snake in commando school watch viral video