"India is not for beginner", चक्क बोटीत DJ च्या गाण्यावर रंगली पार्टी...video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:52 IST2024-09-05T18:47:50+5:302024-09-05T18:52:02+5:30
व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

"India is not for beginner", चक्क बोटीत DJ च्या गाण्यावर रंगली पार्टी...video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यावर नेटीझन्स मजेशीर प्रतिक्रिया देतात. गेल्या काही काळापासून India is not for beginner हे वाक्य ट्रेंडिंगवर आहे. पण, आता बिहारचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही Bihar is not for beginnerम्हणाल.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
नदी किंवा तलाव पार करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी बोटीत DJ पार्टी सुरू असल्याचे पाहिले आहे का? तुम्ही अनेकदा रस्त्यावर DJ वाजताना पाहिजे असेल, पण या व्हिडिओ चक्क एका बोटीत DJ पार्टी सुरू असल्याचे दिसत आहे. नदी पार करणाऱ्या या बोटीत अनेकजण DJ च्या गाण्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bihari_memerwaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत 'Bihar is not for beginner's, बिहारमध्ये सर्वकाही शक्य आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 3 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर हजारो लांनी व्हिडिओ पाहिला आहे. अनेक नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये त्याचे नाव 'क्रुस्वा' असे लिहिले. आणखी एका यूजरने लिहिले - भाऊ, हे बिहार आहे, येथे काहीही होऊ शकते. पण हा व्हायरल व्हिडिओ आसामचा असल्याचे एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे.