शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

Ravindra Jadeja, IND vs AUS: रवींद्र जडेजाने फक्त २४ तासांसाठी केलं ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला 'फॉलो'; जाणून घ्या त्यामागची मजेशीर गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:01 IST

इन्स्टाग्राम स्टोरीवर जाडेजाने तो स्क्रीनशॉटही केला शेअर

Ravindra Jadeja Nathan Lyon, IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर यजमानांनी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे टीम इंडियाने तिसऱ्या दिवशीच हा सामना जिंकला. या दरम्यान, अष्टपैलू रवींद्र जाडेजाने सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या एका खेळाडूला सोशल मीडियावर एक 'भेट' दिली.

जाडेजा ठरला सामनावीर

अष्टपैलू रवींद्र जाडेजाने दिल्ली कसोटीत चमकदार कामगिरी केली. त्याने दोन्ही डावात एकूण १० विकेट्स घेतल्या. जाडेजाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने पहिल्या डावात २१ षटकांत ६८ धावांत ३ बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात  त्यांना कांगारूंची तारांबळ उडवली. त्याने १२.१ षटकांत ४२ धावा देत ७ बळी घेतले. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने डावातील उर्वरित ३ विकेट्स घेतल्या.

नॅथन लायन-जाडेजा कनेक्शन

३४ वर्षीय रवींद्र जाडेजा या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनच्या फॉलो करू लागला. तो आता फक्त इंस्टाग्रामवर लायनला फॉलो करतो. त्याचा स्क्रीनशॉटही त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. जाडेजाने सांगितले की, तो २४ तास नॅथन लायनला फॉलो करत आहे. अशा स्थितीत जाडेजाने एखादी पैज हरली आहे की असे करण्यामागे आणखी काही कारण आहे, याचा चाहतेही विचार करत आहेत. पण जाडेजाने मात्र नॅथन लायनला आपला मित्र म्हटले आहे.

हे आहे खरं कारण

जाडेजाने लायनला फॉलो का केलं त्याचं खरं कारण पहिल्या डावात लपलेलं आहे. जाडेजाला इन्स्टाग्रामवर कोणालाच फॉलो करत नाही. त्यावरूनच या दोघांमध्ये संवाद झाला. पहिल्या डावात लायन जाडेजाला म्हणाला, "तू मला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीस. तू मला फॉलो करशील याची मी कधीपासून वाट पाहतोय. तू इतर कोणालाही फॉलो करत नाहीस. मला फॉलो करशील का?" हे संपूर्ण संवाद स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला. त्यानंतर जाडेजाने हे मजेशीर काम केलं.

भारताने मिळवला मोठा विजय

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांत आटोपल्यानंतर भारताने २६२ धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ ११३ धावांवर रोखला. त्यानंतर टीम इंडियाने ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाravindra jadejaरवींद्र जडेजाAustraliaआॅस्ट्रेलियाR Ashwinआर अश्विनInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरल