लक्झरी कारमधून भीक मागायला जातात सासरचे लोक, डॉक्टर सूनेनं केला त्यांचा भांडाफोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:40 IST2025-02-28T14:39:35+5:302025-02-28T14:40:07+5:30

ही तरूणी लग्न करून ज्या घरात गेली, त्या घरातील लोकांबाबत तिला असं काही समजलं की, तिनं सासर सोडलं.

In laws beggar family goes in luxury cars Pakistani doctor women reveals | लक्झरी कारमधून भीक मागायला जातात सासरचे लोक, डॉक्टर सूनेनं केला त्यांचा भांडाफोड!

लक्झरी कारमधून भीक मागायला जातात सासरचे लोक, डॉक्टर सूनेनं केला त्यांचा भांडाफोड!

दोन तोंडी लोकं...हे शब्द अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील किंवा दोन तोंडी लोकं तुम्ही पाहिलीही असतील. दोन तोंडी लोकांना काय दोन तोंड नसतात. पण ते दोन मुखवटे घालून फिरत असतात. म्हणजे जे ते आहेत ते नसतात, जे असतात ते दाखवत नाहीत. हे लोक आपली खरी ओळख लपवून ठेवतात आणि मुखवटा घालून जगत असतात. जीवन जगत असताना अनेकदा अशा काही गोष्टींचा आपल्यासमोर खुलासा होतो, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. असाच काहीसा धक्कादायक खुलासा पाकिस्तानातील एका तरूणासमोर झाला. ही तरूणी लग्न करून ज्या घरात गेली, त्या घरातील लोकांबाबत तिला असं काही समजलं की, तिनं सासर सोडलं.

लग्नाच्या केवळ ४ ते ५ महिन्यात तरूणीसमोर सासऱ्या लोकांचा भांडाफोड झाला आणि ती हैराण झाली. तरूणी सुरूवातीला आनंदाने संसार करत होती. पण अचानक तिला समजलं की, ज्या आलिशान बंगल्यात ती राहते, लक्झरी कारमध्ये फिरते ते सगळे सासरच्या लोकांनी भीक मागून कमावलं आहे. तरूणी एमबीबीएस डॉक्टर आहे आणि तरी सुद्धा ती या फसणुकीची शिकार झाली.

पाकिस्तानचा यूट्यूबर सैय्यद बासित अली यानं एका तरूणीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तरूणीनं सांगितलं की, तिचं लग्न एका श्रीमंत घरात झालं होतं. ज्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांचा बंगला होता आणि सगळ्या सुविधा होत्या. ४ ते ५ महिने ती या घरात आनंदाने राहिली. पण अचानक समोर एक ट्विस्ट आला. तरूणीच्या लक्षात आलं की, घरातील लोक एकत्र एका लॅंड क्रूजर आणि फॉर्च्यूनर सारख्या गाड्यांमध्ये बसून कुठेतरी बाहेर जातात. अशात ते कुठं जातात हे जाणून घेण्यासाठी तिनं त्यांचा पाठलाग केला आणि जे दिसलं ते पाहून धक्का बसला.

भीक मागण्याचा बिझनेस

सासरमधील लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि कटोरा घेऊन भीक मागत होते. इतकंच नाही तर त्यांनी घराच्या बेसमेंटमध्ये एक मेकअप आर्टिस्टही ठेवला होता. जो त्यांचं भिकाऱ्यांचं मेकअप करून देत होता. सगळे वेगवेगळे गेटअप करत होते. तरूणीनं जेव्हा हे सगळं आपल्या परिवाराला सांगितलं तर त्यांनाही धक्का हसला. सासरच्या लोकांनी त्यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा बिझनेस असल्याचं म्हटलं होतं. आता तरूणी सासर सोडून माहेरी आली आहे आणि आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत आहे. 
 

Web Title: In laws beggar family goes in luxury cars Pakistani doctor women reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.