गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:49 IST2023-01-19T17:48:38+5:302023-01-19T17:49:39+5:30
गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला.

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान
वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. अनियंत्रित कार एका दुकानात शिरली आणि एकच खळबळ उडाली. खरं तर ही कार एक महिला चालवत होती. अनियंत्रित कार थांबवण्यासाठी महिलेने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला. यामुळे कार दुकानात शिरली ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, काल संध्याकाळी वडोदरातील अलकापुरी भागात एक महिला आपल्या कारमधून जात होती. अचानक तिचे कारवरील नियंत्रण सुटले. यादरम्यान तिने अनियंत्रित कारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला.
ब्रेकऐवजी दाबला ॲक्सिलेटर
महिलेने भीतीमुळे ब्रेकऐवजी जोराने ॲक्सिलेटर दाबला. त्यामुळे कारने वेग पकडला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात प्रवेश केला. कार दुकानात शिरल्यावर मोठा आवाज झाला अन् परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली.
कारच्या धडकेत दुकानाचे मोठे नुकसान
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाच्या मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या धडकेने दुकानात ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात मालाचा चक्काचूर झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"