देव तारी त्याला कोण मारी; ट्रकमध्ये घुसली भरधाव कार, चालकाला ओरखाडाही नाही, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:41 IST2023-05-19T18:31:03+5:302023-05-19T18:41:15+5:30
सुरक्षित गाडी का घ्यावी? याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ पाहून मिळेल.

देव तारी त्याला कोण मारी; ट्रकमध्ये घुसली भरधाव कार, चालकाला ओरखाडाही नाही, पाहा Video...
Safety Awareness While Driving: तुम्ही सोशल मीडियावर रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही घटनांमध्ये लोकांचा जीव वाचतो तर काही घटनांमध्ये मृत्यू होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका कारचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. पण, सुदैवाने या अपघातात चालकाला थोडीही इजा होत नाही.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कार मोठ्या ट्रकवर धडकल्याचे दिसत आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, या अपघातात कारचा चकनाचूर झाला आहे. ही कार त्या ट्रकच्या खाली घुसल्याचे दिसत आहे. यावेळी कारमधील एअरबॅगही उघडल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी वाहनाची अवस्था पाहून त्यातील एकाही व्यक्तीचा जीव वाचला नसेल, असे तुम्हाला वाटेल.
Importance of seat belt and airbag....... pic.twitter.com/qpRHA1zT37
— Swati Lakra (@SwatiLakra_IPS) May 19, 2023
पण जेव्हा लोक कारचा दरवाजा उघडतात, तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर येते. सुदैवाने त्या व्यक्तीला ओरखडाही आला नाही. कारच्या एअरबॅग्ज आणि सीट बेल्टमुळेच त्याचा जीव वाचला. हा व्हिडिओ IPS अधिकारी स्वाती (@SwatiLakra_IPS) यांनी ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले – सीट बेल्ट आणि एअरबॅगचे महत्त्व. व्हिडिओला 45 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1400 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.