शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

IIT थर्ड इयरचा २२ वर्षीय विद्यार्थी चालवतोय तीन कंपन्या; २२ कोटींचा टर्नओव्हर, मॅगी खाऊन काढायचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:45 IST

वाराणसीचा २२ वर्षीय सौरभ मौर्य सध्या देशातील तरुणांचा आदर्श ठरत आहे. सौरभ IIT BHU मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि त्यासोबतच तीन स्टार्टअप कंपन्या देखील तो चालवतोय.

वाराणसीचा २२ वर्षीय सौरभ मौर्य सध्या देशातील तरुणांचा आदर्श ठरत आहे. सौरभ IIT BHU मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि त्यासोबतच तीन स्टार्टअप कंपन्या देखील तो चालवतोय. महत्वाची बाब म्हणजे या कंपन्यांचं वार्षिक उत्पन्न तब्बल २२ कोटी रुपये इतकं आहे. सौरभ एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा असून त्यानं मोठ्या कष्टानं हे यश प्राप्त केलं आहे. 

सौरभचं बालपणीचं शिक्षणवाराणसीच्या जवळच असलेल्या एका गावात झालं. राहत्या घरापासून तब्बल ४ किमी अंतरावर त्याची शाळा होती आणि तो नेहमी पायी शाळेत जायचा. "वाराणसीच्या छोट्याशा गावात मी राहत होतो. त्यामुळे त्यावेळी माझी स्वप्न देखील छोटीच होती. बाजारात जायचो तेव्हा कॉम्यूटर किंवा मोबाइलचं दुकान पाहून मीही असंच एक दुकान सुरू करेन असा विचार करायचो. पण माझ्या आजी-आजोबांचं स्वप्न वेगळंच होतं. त्यांना नेहमी वाटायचं मी खूप शिक्षण घ्यावं. त्यामुळे आम्हा तीन भावंडांना कुटुंबीयांनी शिक्षणासाठी वाराणसीला पाठवलं", असं सौरभ सांगतो. 

दिवस-रात्र एक करुन JEE उत्तीर्ण झाला"मला आजही आठवतं मी इयत्ता ११ वीत होतो आणि माझे दोन्ही भाऊ १२ वीत होते. दोघंही IIT ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. मीही १२ वीनंतर IIT करावं अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण मला तेव्हा कॉम्प्यूटरचं दुकान सुरू करायचं होतं. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार मी IIT करायचं ठरवलं पण मी १२ वीत JEE परीक्षेत नापास झालो. त्यादिवशी मी खूप रडलो. कुटुंबीय माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि मी पुन्हा उभा राहिलो. त्यानंतर मी दिवस-रात्र मेहनत घेतली. हॉस्टेलची परिस्थिती, सण, कॉम्प्यूटर, सिनेमे, मोबाइल, सोशल मीडिया या सर्वांपासून मी दूर राहिलो आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केलं. अखेरीस मी IIT JEE उत्तीर्ण झालो", अशी प्रेरणादायी कहाणी सौरभनं सांगितली. 

करिअर नेमकं कसं घडलं?सौरभ सांगतो की,"IIT उत्तीर्ण झाल्यानंतर मला चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळाली असती. पण मला सुरुवातीपासूनच स्वत:चं असं काहीतरी करायचं होतं. २०१८ साली जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मला आईनं बाबांच्या नकळत ५ हजार रुपये दिले होते. यातून मी माझ्या मित्राकडून सेकंड हँड मोबाइल खरेदी केला आणि इथूनच माझ्या नव्या करिअरची सुरुवात झाली"

एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. यात तो IIT संदर्भातील काही महत्वाच्या टीप्स आणि धडे विद्यार्थ्यांना देऊ लागला. सुरुवातीला एक साधा बोर्ड देखील त्याच्याकडे नव्हता. हळूहळू पैसे जमा करुन सौरभनं १३०० रुपयांचा एक व्हाइट बोर्ड खरेदी केला आणि त्यावर टिप्स लिहून त्याचे व्हिडिओ शूट करुन चॅनलवर अपलोड करू लागला. 

"मी व्हिडिओ तयार करण्याचं सातत्य कायम राखलं. त्यात कधीच खंड पडू दिला नाही. एकदा एका व्हिडिओवर एकानं कमेंट केली आणि सांगितलं की 'मित्रा आमच्याकडे आयआयटीसाठीचं शिक्षण देणारं कुणीच नाहीय. तू आमची शिकवणी घेशील का?' याच कमेंटनंतर मी माझा पहिला स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. इयत्ता ११वी, १२ वीच्या अशा विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन देणं सुरू केलं की जे IIT ची तयार करत आहेत", असं सौरभनं सांगितलं. 

२०१९ साली पहिली कंपनी, पहिल्याच वर्षी ११ कोटींची उलाढालविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्यासाठी काही खास कोर्सेस तयार करणं देखील महत्वाचं होतं. याचाच विचार करुन सौरभनं २ हजार रुपयांत क्रॅश कोर्स संकल्पना सुरू केली. २०१९ साली एसएसडी एडटेक लिमिटेड नावाची कंपनी त्यानं सुरू केली. यात एका बाजूला विद्यार्थ्यांसाठी कोर्स आणि दुसऱ्या बाजूला मार्गदर्शन अशा पद्धतीनं काम करणं सुरू केलं. केवळ १५०० रुपयांनी सुरू केलेला स्टार्ट अप  एकाच वर्षात ११ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला.

यासोबतच विद्यार्थ्यांना हॉस्टेल, पीजी, कर्ज यासारख्या सुविधा देण्यासाठी रँकर्स कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सौरभनं सुरू केली. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, राहण्याची व्यवस्था, शिक्षणासाठीचं कर्ज या गोष्टींवर काम केलं. आजच्या घडीला सौरभच्या कंपनीच्या वाराणसीमध्ये तीन शाखा आहेत. तर एक शाखा गाझियाबादमध्येही आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी २०० हून अधिक IIT चे मेंबर्स जोडले गेलेले आहेत. १३ शिक्षक आहेत. तर ३० हून अधिक लोक असे आहेत की जे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करतात. महिन्याला किमान ४५ लाखांचे कोर्सेसची विक्री सौरभच्या कंपन्यांकडून होत आहे. 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रVaranasiवाराणसी