"पप्पा, मी सीए झाली"; चहावाल्याच्या मुलीची नेत्रदिपक भरारी, टोमणे मारणाऱ्यांची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:50 IST2025-03-04T16:49:11+5:302025-03-04T16:50:16+5:30
सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमिताने तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

"पप्पा, मी सीए झाली"; चहावाल्याच्या मुलीची नेत्रदिपक भरारी, टोमणे मारणाऱ्यांची बोलती बंद
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. अमिता प्रजापतीने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. २०२४ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अमिताने तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. १० वर्षांचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयानंतर तिचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं. जे अशक्य वाटत होतं ते अखेर शक्य झालं.
अमिताने लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये तिचा प्रवास शेअर केला. अभ्यासात हुशार नाही असं तिच्यावर लेबल लावलं जात होतं. पण तिने मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस केलं. तिचे पालक उदरनिर्वाहासाठी चहा विकायचे, त्यांना अनेक लोकांनी टोमणे मारले. विविध समस्यांचाही त्यांना सामना करावा लागला.
अमिता प्रजापति दिल्ली के स्लम में रहती है। अमिता के पिता एक चाय की दुकान चलाते हैं। बेटी CA बनना चाहती थी। पैसा न होने के बावजूद भी पिता ने बेटी के सपने को पूरा किया। मेहनत करके बेटी को CA बनाया। CA एग्जाम क्लीयर करने के बाद अमिता अपने पिता को गले लगाकर खूब रोई और बोली
— अपूर्व اپوروا Apurva Bhardwaj (@grafidon) July 22, 2024
पापा मैं… pic.twitter.com/lKHwjbh3XM
"तुमची मुलगी सीए होणार नाही"
अमिताच्या वडिलांनी जेव्हा मुलीच्या शिक्षणाचा विचार केला. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते झोपडपट्टीत राहत होते. त्यामुळे मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून घर बांधण्याचा अनेकांनी सल्ला दिला. तुमची मुलगी सीए होऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या मोठ्या झालेल्या मुलींसोबत रस्त्यावर किती काळ राहणार? ती एक दिवशी निघून जाईल आणि तुमच्याकडे काहीही उरणार नाही असं लोकांनी म्हटलं.
वडिलांचे पाणावले डोळे
अमिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाच्या यशाची बातमी ऐकून वडील भावुक होताना दिसत आहेत. अमिता तिच्या वडिलांना मिठी मारते तेव्हाचा हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळतो. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. आज मी जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळे आणि आईमुळे आहे, ज्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला असं अमिताने सोशल मीडियावर म्हटलं आहे. कठीण परिस्थितीतही हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिलो तर आपल्याला नक्कीच यश मिळतं हे अमिताने सिद्ध केलं आहे.