७ वर्षांचं रिलेशनशीप, पण लग्नानंतर पहिल्याच रात्री आली घटस्फोट घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:59 IST2022-11-16T07:58:18+5:302022-11-16T07:59:44+5:30

जगात असे खूप कमी लोक आहेत की ज्यांना त्यांचं खरं प्रेम मिळतं आणि ते आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत व्यतित करतात. अनेकदा असंही पाहायला मिळतं की वर्षानुवर्षे असलेली नाती लग्नाआधीच तुटतात तर काही नाती लग्नानंतरही तुटतात.

husband wife divorce on first night of wedding whereas they were in relationship for 7 years | ७ वर्षांचं रिलेशनशीप, पण लग्नानंतर पहिल्याच रात्री आली घटस्फोट घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं? 

७ वर्षांचं रिलेशनशीप, पण लग्नानंतर पहिल्याच रात्री आली घटस्फोट घेण्याची वेळ; नेमकं काय घडलं? 

जगात असे खूप कमी लोक आहेत की ज्यांना त्यांचं खरं प्रेम मिळतं आणि ते आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत व्यतित करतात. अनेकदा असंही पाहायला मिळतं की वर्षानुवर्षे असलेली नाती लग्नाआधीच तुटतात तर काही नाती लग्नानंतरही तुटतात. पण तुम्ही कधी लग्नाच्या पहिल्या रात्रीच नात्यात घटस्फोट होण्याची वेळ आल्याचं प्रकरण तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर नुकतीच अशी एक घटना घडली आहे. जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर सय्यद बासित अली नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पती-पत्नी दोघंही दिसतात आणि यात पती लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगत आहे. पतीच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला समजलं की लग्नाआधी त्याच्या पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. हीच गोष्ट तिनं लग्न होईपर्यंत आपल्यापासून लपवून ठेवली असा आरोप पतीनं केला आहे. 

पतीनं दिलेल्या माहितीनुसार, लग्नाआधी तो त्याच्या पत्नीसोबत सुमारे ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. परंतु ते आठवड्यातून फक्त एक-दोन वेळा भेटत होते. अशा परिस्थितीत ती उरलेल्या वेळेत घरी काय करायची याविषयी आपल्याला काही कल्पना नव्हती, असं पती सांगतो. 

पत्नीचं म्हणणं काय?
लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रकरण घटस्फोटापर्यंत कसं पोहोचलं? याबाबत बोलताना पत्नी म्हणाली की ती अजूनही तिच्या प्रेमाचा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा आदर करते आणि त्याच्यावर प्रेम करते. पण तो माझ्यावर संशय घेत आहे. पत्नी आपलं स्पष्टीकरण देत असतानाच पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू होतो. यात व्हिडिओत दिसणाऱ्या रिपोर्टरनं मध्यस्थी करत एखाद्या महिलेवर असं गंभीर आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे, कारण यामुळे महिलांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, असं म्हणत पतीची कानउघडणी करताना दिसतो. 

Web Title: husband wife divorce on first night of wedding whereas they were in relationship for 7 years