गजब! अगोदर लव्हमॅरेज केले, नंतर जुन्या प्रियकरावर झाले प्रेम, पतीला समजल्यानंतर ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:49 IST2022-11-23T13:47:12+5:302022-11-23T13:49:22+5:30
प्रेमात कधी काय होईल सांगता येत नाही,प्रेमात कधी गु्न्हा घडतो तर कधी प्रेमाने सर्व प्रश्न सुटले जातात. असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे.

गजब! अगोदर लव्हमॅरेज केले, नंतर जुन्या प्रियकरावर झाले प्रेम, पतीला समजल्यानंतर ...
प्रेमात कधी काय होईल सांगता येत नाही,प्रेमात कधी गु्न्हा घडतो तर कधी प्रेमाने सर्व प्रश्न सुटले जातात. असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर मधील हे प्रकरण आहे. चार महिन्यापूर्वी येथील एका तरुणीने आपल्या मर्जीने एका तरुणासोबत लव्हमॅरेज केले. यानंतर काही महिन्यांनी पुन्हा तिचे पूर्वीच्या प्रियकरासोबत प्रेम झाले, हे पतीला समजल्यानंतर पतीने तिचा विवाह त्या प्रियकरासोबत लावून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
या दोघांच्या लग्नावेळी स्वत: पती आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते,उत्तरप्रदेश मधील मिर्झापूर येथील एका रिक्षाचालक विश्वजीत याच्यावर प्रेम जडले, यानंतर काही दिवसांनी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर हे दोघे दोन महिने एकत्र राहिले, यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीचा अगोदरच्या प्रियकराला या सर्व गोष्टी जमजल्या. यानंतर तो एकदा त्या तरुणीची भेट घेण्यासाठी घरी गेला.पण तरुणीने त्याला ओळखण्यास नकार दिला. कुटुंबासमोर त्याला ओळख दिली नाही.
यानंतर काही दिवसानंतर या तरुणीने पुन्हा पूर्व प्रियकरासोबत फोनवर बोलणे सुरू केले. यानंतर या दोघांना एका हॉटेलमध्ये गावकऱ्यांनी पाहिले, यानंतर गावकऱ्यांनी तिला जाब विचारला, तरुणीने गावकऱ्यांशी वादावाद सुरू झाला. पुढ हे प्रकरण पती विश्वजीतच्या घरी गेले.
Funny Viral Photo : लग्न म्हणजे काय? शाळेतल्या मुलाचा निबंध वाचून शिक्षकच चकीत झाले, म्हणाले.....
गावातील नागरिकांनी पतीची बाजू घेऊन त्या तरुणीसी वाद सुरू केला. अखेर पती विश्वजीतने मध्यस्ती करत प्रकरण मिटवण्यासाठी बोसणी सुरू केली. तरुणीचा विवाह पूर्व प्रेमिसोबत लावण्याचा त्याने निर्णय घेतला. पती विश्वजीतने स्वत: तिचा विवाह लावून दिला. सध्या या प्रकरणाची चर्चा परिसरात सुरू आहे.