शेजाऱ्यांना खूश करण्यासाठी घरावर इमोजी काढणं पडलं महागात, हेच ठरलं महिलांच्या भांडणाचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:04 IST2019-08-10T15:00:35+5:302019-08-10T15:04:15+5:30
सोशल मीडियात शब्दांचा वापर न करता आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या इमोजींचा वापर करतो.

शेजाऱ्यांना खूश करण्यासाठी घरावर इमोजी काढणं पडलं महागात, हेच ठरलं महिलांच्या भांडणाचं कारण!
सोशल मीडियात शब्दांचा वापर न करता आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या इमोजींचा वापर करतो. पण एका महिलेला शेजाऱ्यांना खूश करण्यासाठी घराच्या भीतींवर स्मायली आणि इमोजी काढणं वादाचं कारण ठरलंय. कॅलिफोर्नियातील दोन मजली इमारतीची मालक महिला कॅथरीने कीड म्हणाली की, तिने घर फार रंगीबेरंगी तयार केलंय, जेणेकरून डिप्रेशनच्या स्थितीतही शेजाऱ्यांनी आनंदी राहता यावं. माझा उद्देश त्यांना त्रास देणे हा अजिबात नव्हता.
कॅथरीनचं म्हणणं आहे की, मी माझ्या दोन मजली इमारतीला गुलाबी रंगाने रंगवलं आणि भींतींवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्मायली पेंट केल्यात. माझे शेजारी नेहमी दु:खी आणि थकलेले दिसतात, दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लुडबूड करतात. त्यांनी असं करू नये आणि ते आनंदी दिसावे, यासाठी मी घराला असं डेकोरेट केलंय.
तर कॅथरीनची शेजारी सुसेनने कॅथरीनच्या दावा नाकारला आहे. काही दिवसांपूर्वी कॅथरीन आणि सुसेन यांच्या वाद झाला होता. सुसेनचं म्हणनं आहे की, कॅथरीनने तिला चिडवण्यासाठी असं केलंय. घरावर काढण्यात आलेले इमोजी हे नकारात्मक आहेत. एक इमोजी तोडांवर कुलूप लावण्याचा इशारा करत आहे. तर दुसऱ्यात खिल्ली उडवण्याचा अर्थ आहे.
सुसेननुसार, कॅथरीनचं घर समोरच असल्याकारणाने मला हे आवडत नाहीये. जेव्हापासून मी भींतीवरील स्मायली पाहिल्या तेव्हापासून मी माझ्या घराचे पडदे सुद्धा उघडले नाहीत. दरम्यान, इमोजीमुळे घडलेली ही घटना अनोखी आहे. याआधीही सोशल मीडियावर टेलर स्विफ्ट आणि किम कार्दिशियाचा इमोजीवरून वाद झाला होता.