शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा, हे काय?... जेनिफर लोपेझची पॅन्ट घसरली की काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 16:44 IST

सेलिब्रिटी आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशन हा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यात खासकरुन हॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशन अधिकच गाजतात.

सेलिब्रिटी आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशन हा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यात खासकरुन हॉलिवूडसेलिब्रिटींच्याफॅशन अधिकच गाजतात. सध्या अशीच काहिशी चर्चा हॉलिवूडची 49 वर्षीय हॉट अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझची (Jennifer Lopez) होत आहे. आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाणारी जेनिफर नेहमीच आपल्या लूकसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच जेनिफरने न्यूयॉर्कमध्ये असे काही केले की, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेनिफरच्या व्हायरल होणाऱ्या फोटोकडे पाहता क्षणी असे वाटते की, तिची पॅन्ट खाली घसरली की काय? पण प्रकरण वेगळंच आहे. 

जेनिफरचा व्हायरल झालेला फोटो जरा काळजीपूर्वक पाहिला तर, नक्की जेनिफरच्या बाबतीत काय झालं आहे याचा उलगडा होतो. खरं तर जेनिफर पॅन्ट घालायला विसरली नसून तिनं पॅन्टसारखा दिसणारा डेनिम जीन्सचा शूज पायात घातला आहे. तिनं घातलेला शूजचा जीन्ससारखाच पॅटर्न असून तो गुडघ्यापर्यंत आहे. पण जेनिफरने ज्या पद्धतीने हा शूज पायात घातला आहे, तो पाहता तिची जीन्सची पॅन्ट घसरली की काय असा भास पाहणाऱ्यांना होतो.

जेनिफरने घातलेले शूज वर्सा (Versace) या नामांकित ब्रँडचे डेनिम शूज आहेत. त्याला अनेकजण लाँग शूज असेही म्हणतात. सध्या जेनिफरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे तिच्या शूजवर पोलिसांचा बिल्लाही लावण्यात आला आहे. 49 वर्षे वय असूनही हॉट दिसणारी जेनिफर या शूजमुळे आणखी हॉट दिसत आहे, असे म्हणून चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सलाही दाद दिली आहे. तर अनेकांनी हे शूज घातल्यावर पँट घालण्याची गरजच नाही अशी खिल्ली उडवत तिला ट्रोलही केलं आहे.

टॅग्स :HollywoodहॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीfashionफॅशनSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्