शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

Holi 2021 : 'हे' मॅसेजेस पाठवून आपल्या जवळच्यांना द्या होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 10:33 IST

Holi Marathi Viral Messages : हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं (Holi Messages) पाठवून तुम्ही पाठवून  होळीचा सण साजरा करू शकता. 

Holi Marathi Viral Messages : उद्या २८ मार्च रोजी भारतभर होळीचा (Holi 2021) सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार. आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा सण आनंद आणि सुख घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल. हा तुमचा विचार तुमच्या त्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देणं एकदम सोपं आहे.

सध्या प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छांच्या इतकेच डिजिटल शुभेच्छांना(Holi Marathi Messages) सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे, तुम्हाला सुद्धा जर का, Whatsapp Status, Facebook Images किंवा अन्य सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं (Holi Messages) पाठवून तुम्ही पाठवून  होळीचा सण साजरा करू शकता. 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळी संगे केरकचरा जाळू

झाडे वाचवू अन् कचरा हटवू

निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

ईडापीडा दु:ख जाळी रे

आज वर्षाची होळी आली रे

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

लाल रंग तुमच्यासाठी गालांसाठीकाळा रंग तुमच्या केसांसाठीनिळा रंग तुमच्या डोळ्यांसाठीपिवळा रंग तुमच्या हातांसाठीगुलाबी रंग तुमच्या होठांसाठीपांढरा रंग तुमच्या मनासाठीहिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठीहोळीच्या या सार रंगांसोबततुमचे जीवन रंगून जावो...हार्दिक शुभेच्छा

भिजू दे रंग अन् अंग स्वछंद

अखंड उठु दे मनी रंग तरंग...

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळूया आज हे रंग...

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो

सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

होळीच्या अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.

होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

फाल्गुन मासी आली होळी

खायला मिळणार पुरणाची पोळी

रात्री देऊ मनसोक्त आरोळी

राख लावूनी आपल्या कपाळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

रंग प्रेमाचा

रंग स्नेहाचा

रंग नात्यांचा

रंग बंधाचा

रंग हर्षाचा

रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्सवाचा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 

टॅग्स :HoliहोळीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया