स्वत:चेच लग्न आणि नवरदेव स्वत:च पंडीत बनला; मंत्र म्हणू लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:29 IST2025-01-28T19:29:05+5:302025-01-28T19:29:14+5:30

उत्तर प्रदेशच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात स्वत:च्या लग्नात स्वत: नवरदेवच मंत्र म्हणत लग्न लावत आहे.

His own wedding and the groom himself became a Pandit; started chanting mantras... | स्वत:चेच लग्न आणि नवरदेव स्वत:च पंडीत बनला; मंत्र म्हणू लागला...

स्वत:चेच लग्न आणि नवरदेव स्वत:च पंडीत बनला; मंत्र म्हणू लागला...

कोकणात भटजी, घाटमाथ्यावर गुरुजी आणि इतर ठिकाणी पंडित... अशी अनेक नावे. पण लग्न काही त्यांच्याशिवाय लावले जात नाही. कन्यादान असेल की सात फेरे, सगळीकडे शास्त्रोक्त मंत्र म्हणून लग्न लावणारे गुरुजी लागतात. परंतू सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाने स्वत:च हे सर्व विधी उरकले आहेत. 

उत्तर प्रदेशच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात स्वत:च्या लग्नात स्वत: नवरदेवच मंत्र म्हणत लग्न लावत आहे. यावर काही लोकांनी गुरुजींचा खर्च वाचविला अशा कमेंट करत आहेत. काही जण आत्मनिर्भर भारताचे जिवंत उदाहरण असेही म्हणत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या या तरुणाचे लग्न उत्तराखंडमध्ये होते. नवरी मुलगी तिकडची होती. विवेक कुमार हा गेल्या काही काळापासून मंत्रांचा व रिती रिवाजांचा अभ्यास करत होता. त्याच्या लग्नाला दोन्ही कडची वऱ्हाडी होती पण गुरुजी नव्हते. त्याला ओळखणाऱ्यांशिवाय इतर पाहुणेमंडळींना गुरुजींच्या येण्याची उत्सुकता होती. या पठ्ठ्याने स्वत:च मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मुलीकडच्यांचे देखील डोळे विस्फारले. सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली, खिशातून मोबाईल निघाले आणि हा प्रसंग रेकॉर्ड होऊ लागला. 

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालू लागला आहे. २५ जानेवारीचा हा व्हिडीओ असून लोकांनी यावर नवा ट्रेंड सेट केल्याचे म्हटले आहे. काहींनी ती किती लकी आहे असेही म्हटले आहे. 

Web Title: His own wedding and the groom himself became a Pandit; started chanting mantras...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न