वाह, क्या बात! साडीवाल्या बाईचा जबरदस्त स्टंट पाहून डोळे उघडेच राहतील, पाहा व्हायरल व्हिडीओ
By Manali.bagul | Updated: January 8, 2021 18:18 IST2021-01-08T18:17:52+5:302021-01-08T18:18:53+5:30
Trending Viral News in Marathi: एका साडीत स्टंट करणार्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाह, क्या बात! साडीवाल्या बाईचा जबरदस्त स्टंट पाहून डोळे उघडेच राहतील, पाहा व्हायरल व्हिडीओ
अशक्य असं काहीच नसतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सध्याच्या तरूणींना साडी म्हटलं तर कधीतरी नेसायला बरी वाटते. रोज साडी नेसून कामं कशी करणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो. सध्या एका साडीत स्टंट करणार्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. नॅशनल गोल्ड मेडललिस्ट जिम्नॅस्ट म्हणून काम करणार्या पारुल अरोरा यांनी इंस्टाग्रामवर शॉर्ट क्लिप्स पोस्ट केल्याने नेटकरी चकित झाले आहेत.
या व्हिडीओत नक्की काय आहे?
ब्लॅक स्लिव्हलेस ब्लाउज आणि साडी परिधान करुन पारुलने बॅकफ्लिप्स आणि फ्रंटफ्लिप्स अगदी सहज मारावेत तसे मारले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पारुलने पोस्ट केलेल्या एका क्लिपमध्ये तिने साडीत फ्लिप केल्या होत्या. अरुलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिच्या इन्स्टाग्राम फॅन्सनी पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली
एका सोशल मीडिया युजरने 'आश्चर्यकारक' अशी रिएक्शन दिली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून साडीवर बॅकफ्लिप्स, हुला हूपिंग करण्याचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या स्टंटना पसंती मिळताना दिसून येत आहेत. अशा पद्धतीचे अनोखे व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून इन्स्टाग्रामवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस