VIDEO : एक्सरसाईज करताना घसरून पडली तरूणी, मदद करणाऱ्या व्यक्तीला म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:17 IST2021-07-30T16:17:07+5:302021-07-30T16:17:46+5:30
अनेकदा एक्सरसाइज करताना काही चुका केल्या तर काहीना काही अपघात होतात. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर ऐशले नावाच्या २२ वर्षीय तरूणीचं अकाउंट आहे.

VIDEO : एक्सरसाईज करताना घसरून पडली तरूणी, मदद करणाऱ्या व्यक्तीला म्हणाली....
काही तरूणी जिमबाबत फारच गंभीर असतात. त्यांना आपल्या फिटनेस रूटीनमध्ये अडथळा आणणं अजिबात आवडत नाही. अशीच एक फिटनेस फ्रीक तरूणी एशले टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर आपले एक्सरसाइज व्हिडीओ शेअर करत असते नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती वेटलिफ्टिंग करता करता घसरली.
अनेकदा एक्सरसाइज करताना काही चुका केल्या तर काहीना काही अपघात होतात. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर ऐशले नावाच्या २२ वर्षीय तरूणीचं अकाउंट आहे. या तरूणीने टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ दिसतं की, ऐशले वजन उचलताना अचानक घसरते.
ऐशले घसरताच एक व्यक्ती मदतीसाठी तिच्याजवळ येतो. त्याने ऐशलेला उठण्यासाठी हात दिला. सामान्यपणे कुणी जर मदत केली तर त्या व्यक्तीचे धन्यवाद मानले जातात. पण ऐशलेसोबत काही वेगळंच झालं. तिला त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणायची आठवणच राहिली नाही. उलट ती हे म्हणाली की, ती पडल्याची तिला लाज वाटत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअऱ करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २२ हजार लोकांनी पाहिला. जास्तीत जास्त लोक कमेंट बॉक्समध्ये मदत करणाऱ्या व्यक्तीबाबत विचारत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐशलेने एक टिकटॉक व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं की, ती त्या व्यक्तीसोबत डेटवर गेली होती.