Gulab jamun ki sabzi on twitter goes viral | अरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळ
अरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळ

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा या व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये असं काही पाहायला मिळतं की, ते पाहून आपल्याला काही सुचणचं बंद होतं. अनेकदा तर हे खरचं असं आहे का?, असा प्रश्न पडतो. असाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. ते पाहून नेटकऱ्यांना अगदी भंडावून सोडलं आहे. काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घ्या. 

हर्ष नावाचा एका ट्विटर यूजरने सर्वांना हैराण करून सोडलं आहे. व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या या व्यक्तीने ट्विटरवर एक विचित्र फोटो शेअर केला आणि नेटकऱ्यांचं डोकं फुटायचीच वेळ आली. काही दिवसांपूर्वी हर्ष एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथे त्याला मेन्यूमध्ये एक विचित्र पदार्थ पाहायला मिळाला. तो पदार्थ म्हणजे, 'गुलाब जामची भाजी'... चक्रावून गेलात ना? 

गोड गुलाब जाम जो जीभेवर ठेवला की, फक्त खातच रहावासा वाटतो. सणावाराला अगदी सर्रास या पदार्थाची आपल्याला आठवण येते. पण त्या गुलाब जामची आता भाजी तयार करण्यात येत आहे? असं कसं होऊ शकतं? अनेकांना हे पाहून आश्चर्य वाटलं आणि काही तर पुरते भंडावून गेले होते. 

सोशल मीडियावर काही यायला अवकाश नेटकरी त्यावर मजा घेण्यासाठी तयारच असतात. त्यातल्यात्यात गुलाब जामची भाजी म्हणजे, त्यांच्या हाती लागलेला भन्नाट विषय. पाहूयात नेटकऱ्यांनी केलेल्या हटके कमेंट्स... 

काळजाचा ठोकाच चुकला हे वाचून... 

शप्पथ घेऊन सांगतो, मी असं काही पाहिलचं नाही... 

सहन करू थोडं...

अरे याला तरी सोडा यार... 

अरे देवा... 


Web Title: Gulab jamun ki sabzi on twitter goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.