ऐन वरातीत नवरदेवाची पँट फाटल्यावर 'असं' झालं की, व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:13 IST2020-02-22T14:56:40+5:302020-02-22T15:13:49+5:30
वरातीत नवरदेवाची फजिती झाल्यानंतर त्याने राग कसा काढला ते या व्हिडीओतून दिसून येतोय.

ऐन वरातीत नवरदेवाची पँट फाटल्यावर 'असं' झालं की, व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसाल!
लग्न असो किंवा लग्नाची वरात हे दोन प्रसंग नेहमी आयुष्यात लक्षात राहणारे असतात. तुम्हाला माहीत असेल की अनेकदा लग्नाचा प्रसंग असला कि गोंधळ उडतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात फक्त काही गोंधळ व्हायचा उशीर लगेच फोटो किंवा व्हिडीयो व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फक्त टिकटॉकवर नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.
तर हा व्हिडीओ आहे एका लग्नाच्या वरातीतील.लग्नाच्या वरातीमध्ये अनेक किस्से पाहायला मिळतात. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाची फजिती झाली आहे. घोड्यावर बसलेल्या नवऱ्याला सारखं खाली उतरवल्यामुळे पुन्हा एकदा घोड्यावर चढताना नवरदेवाची फजिती झाली आहे. ( हे पण वाचा-इवांका ट्रम्पने एकेकाळी फॅशन विश्वातही घातला होता धुमाकूळ, फोटोत बघा रॅम्पवर कसा असायचा तिचा जलवा!)
या फजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला. नवदेवाचा ही वैतागलेली रिएक्शन पाहून तुम्ही नक्की हसाल‘माझी पँट फाटली आहे असं म्हणत तो दुसरी पँट आणण्याचे आदेशही वऱ्हाड्यांना देतो. या व्हिडीओला वरातीमधीलच कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून टिकटॉकवर पोस्ट केलं आहे.
( हे पण वाचा-त्याने प्रेयसीचा 'तो' व्हिडीओ आणि तिच्या घराचा पत्ता पॉर्न वेबसाइटवर केला शेअर आणि.....)