मंडपात सप्तपदी घेणार होता नवरदेव, कॅमेराच्या फ्लॅशनं झाला त्याचा भांडाफोड; लग्न कॅन्सल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:15 IST2025-06-11T16:46:29+5:302025-06-11T17:15:53+5:30
Viral News : नवरदेवाच्या एका गोष्टीचा भांडाफोड झाला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाचा भांडाफोड फोटोग्राफरच्या कॅमेरामुळे झाला.

मंडपात सप्तपदी घेणार होता नवरदेव, कॅमेराच्या फ्लॅशनं झाला त्याचा भांडाफोड; लग्न कॅन्सल...
Viral News : उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील मलई गावातील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेहमीच लग्नात घडणाऱ्या अजब घटना समोर येत असतात. कधी भांडणं होतात, तर कधी नवरी किंवा नवरदेव पळून जातात. पण आता ज्या लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यात वेगळीच भानगड झाली. इथे नवरदेवाच्या एका गोष्टीचा भांडाफोड झाला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाचा भांडाफोड फोटोग्राफरच्या कॅमेरामुळे झाला.
झालं असं की, नवरदेव सप्तपदी घेण्यासाठी बसला होता. तेव्हा फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी आला. त्यानं फोटो क्लिक करताच, कॅमेराचा लाइट नवरदेवाच्या डोळ्यांवर पडला आणि तेव्हाच त्याचा एक डोळा वेगळ्याच पद्धतीनं चमकू लागला. सगळ्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. वाद वाढला तेव्हा पोलिसांनाही बोलवण्यात आलं.
मलई गावातील राम सेवच्या बहिणीचं लग्न निजामुद्दीनपूरच्या पिंटू गौतमचा मुलगा जगमोहनसोबत ठरलं होतं. वरात वाजतगाजज गावात आली. लग्नाचे वेगवेगळे रिवाज सुरू झाले. नवरदेव मंडपात बसला तेव्हा त्याच्या डोळ्यावर कॅमेराचा फोकस पडला आणि अचानक डोळ्यांमध्ये वेगळीच चमक दिसू लागली. ज्यामुळे वेगळीच चर्चा रंगली.
महिलांनी आपसात कुजबूज सुरू केली की, नवरदेवाचा एक डोळा वेगळा दिसत आहे. संशय वाढला तेव्हा नवरीकडील लोकांनी आणखी विचारपूस केली. मंडपातच नवरदेवाला एक डोळा बंद करून समोर बोटं किती आहेत विचारलं गेलं. तो बरोबर उत्तर देऊ शकला नाही. ज्यामुळे हे स्पष्ट झालं की, त्याचा एक डोळा नकली आहे. हे ऐकताच नवरीनं लग्नास नकार दिला.
मंडपात वाद वाढल्याचं पाहून नवरीकडील मंडळींनी पोलिसांना बोलवलं. दोन्हीकडील लोकांमध्ये रात्रभर पंचायत चालली. शेवटी नवरदेवाच्या परिवारानं नवरीच्या परिवाराला १.५ लाख रूपये तेव्हा वाद मिटला. वरात नवरीशिवायच परतली.
दुसरीकडे नवरदेवाच्या वडिलांनी दावा केला की, मुलीकडील लोक लग्नाआधी १० वेळा मुलाला बघण्यासाठी आले होते आणि तेव्हा ते काही नाही म्हणाले. ते म्हणाले की, मुलाचा डोळा नकली नाहीये. त्याने लेन्स लावली होती. लोक या घटनेची सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. एकानं लिहिलं की, "कॅमेरानं केलेला भांडाफोड" अशी कमेंट केली आहे.