शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

अरेरे! घोडी चढण्यापुर्वी झाली नवऱ्याची अशी अवस्था की वऱ्हाडी पोट धरुन हसत सुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:15 IST

नवरदेवाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना हसू अनावर झालं. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.

सोशल मीडिया (Social Media) हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला अनेक मजेशिर आणि गमतीशिर गोष्टी पाहायला मिळतात. लग्न-समारंभासाठी अनेक प्रकारची तयारी सुरु असते हे तुम्ही जाणताच. नवरदेव (Groom) असो वा नवरी (Bride), हे दोघेही लग्नाची तयारी आधीपासूनच तयार करत असतात. तसंच ती वेळ आणि काळ खास बनवण्यासाठी सर्वकाही केलं जातं. मात्र, इतकं होऊनही काही लोक असं काही करतात की ते कृत्य त्यांच्या अडचणीचं कारण बनतं, तर अनेकांना हसू येतं. आता जो एक व्हिडीओ समोर आलाय तो याच प्रकारातील आहे. लग्नासाठी बोहल्यावर चढलेल्या एका नवरदेवासोबत असंच काही घडलं, जेव्हा ऐन मोक्याच्या वेळी त्याची पॅन्ट फाटली.

नवरदेवाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना हसू अनावर झालं. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडीओ GHANTAA नावाच्या पेजवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ चांगलाच पसंत पडला आहे. ते हा व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसंच ते लोक आपल्या माहितीगारांनाही यात टॅग करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की वरात निघत आहे, आजुबाजूचे लोक नाचगाण्यात मश्गूल आहेत. नवरदेव घोडीवर बसण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी त्याची पॅन्ट फाटते. त्यानंतर नवरदेव चांगलाच संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं. तसंच तो रागारागाने आपल्या कुटुंबातील लोकांना दुसरी पॅन्ट घेऊन यायला सांगत आहे. नवरदेव असं बोलू लागताच लोकांना याबाबत माहिती मिळते आणि ते पोट धरुन हसू लागतात.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सर्वजणही हा व्हिडीओ पाहून आपलं हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीलाही उतरत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत हा व्हिडीओ दीड लाख लोकांनी लाईक केलाय. तसंच हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हसणारी इमोजी टाकत आपली प्रतिक्रियाही दिलीय. लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर एका यूजरने कमेंट करत, दुल्हे साहब की तो चढ गई बारात, असं म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न