मंडपात सगळ्यांसमोर नवरदेवाने मेहुणीकडे केली Kiss ची मागणी, बघतच राहिले पाहुणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:39 AM2022-11-22T11:39:38+5:302022-11-22T11:40:38+5:30

Wedding Video: वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळे रिवाज पार पाडले जातात. काही लग्नांमध्ये मजेदार रिवाज असतात. अशाच एका लग्नातील रिवाजाचा गमतीदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Groom demand kiss from his sister-in-law video viral on internet | मंडपात सगळ्यांसमोर नवरदेवाने मेहुणीकडे केली Kiss ची मागणी, बघतच राहिले पाहुणे...

मंडपात सगळ्यांसमोर नवरदेवाने मेहुणीकडे केली Kiss ची मागणी, बघतच राहिले पाहुणे...

Next

Wedding Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओही असतात. लग्नाच्या दिवशी नवरी-नवरदेवासोबत फोकसमध्ये कुणी राहत असेल तर ती मेहुणी असते. मेहुणी फक्त तिच्या होणाऱ्या भाओजीचे शूज लपवून पैसेच मागत नाही तर त्याला अधून-मधून त्रासही देत असते. वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळे रिवाज पार पाडले जातात. काही लग्नांमध्ये मजेदार रिवाज असतात. अशाच एका लग्नातील रिवाजाचा गमतीदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, मंडपात नवरी-नवरदेव बसले आहेत आणि एक रिवाज सुरू आहे. सासू नवरदेवाला हा रिवाज पूर्ण करण्यास सांगते आणि नवरदेव हसत दोन ओळी ऐकवतो. ओळींच्या माध्यमातून नवरदेवाने मेहुणीसोबत गंमत केली. त्याने थेट तिच्याकडे किसची मागणी केली. तेव्हा उपस्थित सगळेच अवाक् झाले. पण हा सगळा गंमतीचा भाग होता. त्यामुळे सगळेच हसत होते.

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ jayan_shu2021 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'हे लगेच पाठ करतो, कुणाला माहीत मलाही कधी कामात पडेल'. 

Web Title: Groom demand kiss from his sister-in-law video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.