सुंदर दिसत नाही! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाने नकार दिला; नवरीचा हसरा चेहरा, एकदम पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:31 IST2022-07-27T16:31:08+5:302022-07-27T16:31:30+5:30
लग्नासाठी ती नटून थटून येते, यासाठी हजारोंचा लेहंगा, घागरा, मेकअप किती तयारी करायची असते. एवढे करून लग्नाच्याच दिवशी भर मंडपात लग्नाची तयारी सुरु असताना नवरदेवाने नकार दिला तर....

सुंदर दिसत नाही! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाने नकार दिला; नवरीचा हसरा चेहरा, एकदम पडला
लग्नाचा दिवस म्हणजे नवरीसाठी खूप भावनिक असतो. एका कुटुंबाला सोडून ती दुसऱ्या कुटुंबात जाणार असते. लव्ह मॅरेज असले तरी माहेरचे आणि सासरचे आयुष्य बदलून जाते. लग्नासाठी ती नटून थटून येते, यासाठी हजारोंचा लेहंगा, घागरा, मेकअप किती तयारी करायची असते. एवढे करून लग्नाच्याच दिवशी भर मंडपात लग्नाची तयारी सुरु असताना नवरदेवाने नकार दिला तर....
ट्यूनीशियामध्ये हा प्रकार घडला आहे. खरेतर ही नववधू अनाथ होती. लग्नाच्या दिवशी मंडपात पाहुणेमंडळी आली होती. अचानक नवरदेवाने लग्नास नकार दिला. याला कारण त्याने वधू सुंदर दिसत नसल्याचे दिले. यामुळे सारेच अवाक झाले. त्याने त्याच्या आईच्या सांगण्यावरून लग्न मोडले. यानंतर दु:खी झालेल्या नवरीने सोशल मीडियावर इमेशनल पोस्ट लिहिली आहे.
ती अनाथ आहे आणि तिने लग्नासाठी खूप पैसे खर्च झाले आहेत. नवरदेवाच्या निर्णयाने तिला आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पोस्टनंतर युजर्सनी नवरदेवावर आणि त्याच्या आईवर टीका केली आहे.
नवरदेवाच्या आईने तिचा फोटो पाहिला होता. फोटो पाहूनच मुलाचे लग्न ठरविले होते. परंतू लग्नाच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात तिला पाहिले आणि वरमाईचा पारा चढला. तिला वाईट-साईट बोलायला सुरुवात केली. तसेच मुलाला लगेचच लग्न मोडण्यास सांगितले. 'द मिरर'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. वराच्या आईला वधू बुटकी आणि कुरुप दिसली.
लग्न मोडल्यानंतर लामिया अल-लबावीने ब्लॉग लिहिला आहे. त्यात लग्नाचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.