घरात सगळीकडे आजीच्या कवळीची सुरू होती शोधाशोध अन् कवळी होती कुत्र्याच्या तोंडात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:41 IST2019-09-04T13:33:54+5:302019-09-04T13:41:09+5:30
गप्पा करत करता आज्जी थकली. आणि एक झोप घेण्यासाठी गेली. आज्जीने तिचे नकली दात म्हणजेच कवळी काढून ठेवली. लूना हे सगळं पाहत होती.

घरात सगळीकडे आजीच्या कवळीची सुरू होती शोधाशोध अन् कवळी होती कुत्र्याच्या तोंडात!
ब्राझीलला राहणारी Anna Carolina Lima कडे एक लूना नावाचा कुत्रा आहे. एक दिवस ती तिच्या आज्जीला भेटायला गेली होती. सोबत लूनाला सुद्धा घेऊन गेली. गप्पा करत करता आज्जी थकली. आणि एक झोप घेण्यासाठी गेली. आज्जीने तिचे नकली दात म्हणजेच कवळी काढून ठेवली. लूना हे सगळं पाहत होती.
जेव्हा आज्जी झोपेतून उठली तेव्हा ती तिची कवळी शोधू लागली होती. पण कुठेच सापडत नव्हती. संपूर्ण घरात कवळी शोधली पण कुठेच सापडली नाही.
बराच वेळ शोधाशोध केल्यानंतरही कवळी काही मिळाली नाही. नंतर कळालं की, आज्जीची कवळी लूनाकडे आहे.
लूनाने आज्जीची कवळी स्वत:ला लावून घेतली होती.