बसखाली जाऊन मर, माझी कार दीड कोटीची; माजी पंतप्रधानांची सून भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:56 IST2023-12-06T06:56:34+5:302023-12-06T06:56:54+5:30
घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक भवानी यांना उद्धट म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे

बसखाली जाऊन मर, माझी कार दीड कोटीची; माजी पंतप्रधानांची सून भडकली
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची सून भवानी रवाना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या एका व्यक्तीला त्यांच्या कारऐवजी बसखाली जाऊन मरण्यास सांगत आहेत. भवानी या उडुपी येथील साळीग्रामला जात होत्या. वाटेत त्यांच्या कारला एका दुचाकीने धडक दिली. यामुळे भवानी रवाना संतापून गाडीबाहेर आल्या. त्यांनी दुचाकीस्वाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
भवानी दुचाकीस्वाराला म्हणाल्या की, तुला मरायचेच असेल तर बसखाली जाऊन तुम्ही मरा. माझी कार दीड कोटीची आहे. ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्याल का? त्यामुळे तुम्ही एखाद्या बसखाली जाऊन जीव द्या, असेही त्या दुचाकीस्वाराला रागात म्हणाल्या.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक भवानी यांना उद्धट म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर, दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने दुचाकी चालवत असल्याबद्दलही काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, अशा शब्दांत बोलल्यामुळे भवानी यांच्यावर नेटकरी टीका करत असून, ही बोलायची पद्धत आहे का, असे विचारत आहेत.